तोल जाऊन रेल्वेखाली आल्याने पायांचा चेंदामेंदा
भारतीय रेल्वेमध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा बाळगून आहात, तर लवकरच या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वप्नांना उजाळा देऊ शकता आणि त्यांना साकार करू शकता. रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC)ने पूर्व रेल्वेमध्ये अप्रेन्टिसच्या पदासाठी उमेदवारणाची नियुक्ती करण्याचे योजिले आहे. भारतीय रेल्वेमध्ये पाऊल ठेवण्यासाठी उमेदवारांकडे ही उत्तम संधी आहे.
हे देखील वाचा : गुगलच्या ‘या’ कामांसाठी तंत्रज्ञानावर मोठी पकड असणे गरजेचे नाही; MBA क्षेत्रातील उमेदवारही करू शकतात अर्ज
जर तुम्हाला भारतीय रेल्वेमध्ये तुमचे भविष्य सजवायचे आहे तर या भरती प्रक्रियेचा जरूर लाभ घ्यावा. एकूण ३,११५ रिक्त जागांसाठी उमेदवारांना अप्रेन्टिसशिप पुरवण्यात येणार आहे. RRC ने या संदर्भात अधिकारीक अधिसूचना जाहीर केली आहे. ९ सप्टेंबर २०२४ ला ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करू पाहणार्या उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा घ्यावा. या अधिसूचनेमध्ये भरतीविषयी सखोल माहिती पुरवण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याअगोदर काही गोष्टींना पात्र असणे आवश्यक आहे. RRC द्वारे जाहीर असलेल्या या अटी शर्तीना अपात्र उमेदवार अर्ज करण्यास देखील अपात्र असतील. या अटी मुख्यता उमेदवारांची आयु तथा त्यांच्या शैक्षणिक विषयासंबंधित आहेत. इंडिया व्हॅकन्सीच्या अनुसार, अर्जकर्त्या उमेदवाराचे किमान वय १५ वर्षे असावे तर कमाल वय २४ वर्षे इतके असावे. महत्वाची गोष्ट म्हणजे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमार्यादेत काही प्रमाणात सूट दिली जाईल. शैक्षणिक अटी पाहिल्या तर उमेदवारांचे किमान दहावी शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण असावे. तर उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रामध्ये ITI प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
हे देखील वाचा : Jute कॉर्पोरेशनने अधिसूचना केली जाहीर; १२ उत्तीर्ण उमेदवारांना करता येणार अर्ज
उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये मेरीटनुसार उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर त्यांना दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावून घेतला जाईल आणि शेवटी वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. या सर्व प्रक्रियांमध्ये पात्र उमेदवाराची अप्रेंटिस पदासाठी नियुक्ती केली जाईल. अर्ज करण्याची पद्धत पूर्णता ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना RRC च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. अर्ज करताना उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारले जाईल. सामान्य श्रेणी तसेच ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवर्णाना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर इतर SC /ST /PWD आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही अर्जशुल्क आकारण्यात येणार नाही.