फोटो सौजन्य - Social Media
अनेक जणांना असा नेहमी गैरसमज असतो कि गुगलमध्ये फक्त त्या लोकांनाच काम करता येते ज्यांच्याकडे तंत्रज्ञान क्षेत्रात महारत हासील असते. जर तुम्हाला गुगल मध्ये मोठ्या पदावर काम करायचे आहे. परंतु, तुमच्याकडे तंत्रज्ञान क्षेत्रात जास्त ज्ञान नाही आहे. तरी तुम्ही गुगलमध्ये मोठ्या रक्कमेच्या पगारावर काम करू शकता. गुगलमध्ये अशा अनेक उच्च वेतनाची पदे आहेत ज्यामध्ये तंत्रज्ञानाव्यतिरिक्त इतर शैक्षणिक क्षेत्रातील उमेदवारांची गरज असते.
हे देखील वाचा : ८०० जागांपेक्षा जास्त जागांसाठी भरतीला सुरुवात; अंगणवाडी कार्यकर्ता पदी होणार निवड
व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तसेच MBA आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना गुगल मध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्या हमखास मिळतात. महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवार बऱ्यापैकी अनुभवी असणे फार गरजेचे असते. विशेष गोष्ट अशी आहे कि जर उमेदवाराचे शिक्षण कोणत्या शैक्षणिक संस्थेतून झाले आहे? हे फार महत्वाचे असते. देशातील मोठ्या शैक्षणिक इन्स्टिट्यूटमधून शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवाराची गुगल सारख्या मोठ्या कंपनीमध्ये नियुक्ती होण्याचे शक्यता जास्त असतात.
गुगल प्रोडक्ट मॅनेजर
अनेक मोठ्या कंपन्या व्यवसाय क्षेत्रामध्ये शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना गुगल प्रोडक्ट मॅनेजरच्या पदासाठी हायर करतो. विशेष म्हणजे गुगल मध्ये गुगल प्रोडक्ट मॅनेजरला कोटींच्या घरामध्ये पॅकेज मिळतो.
गुगल प्रोग्रॅम मॅनेजर
जर तुमच्याकडे व्यवस्थापनेचे उत्तम कौशल्य आहे तर तुम्ही गुगल प्रोग्रॅम मॅनेजरच्या पदासाठी नक्की प्रयत्न करू शकता. अमेरिकासारख्या देशामध्ये या पदाला कोटींच्या घरात वेतन आहे.
गूगल प्रोडक्ट मार्केटिंग मॅनेजर
गूगल प्रोडक्ट मार्केटिंग मॅनेजर पदाची एव्हरेज सॅलेरी १ कोटी ४३ लाख रुपये इतकी असते. या पदावर काम करणारा व्यक्ती नवनवीन प्रोडक्ट्स लॉंच करतो.
हे देखील वाचा : राज्यात नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन केले जाणार- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
गूगल स्ट्रॅटजी एंड ऑपरेशंस मॅनेजर
टॉप मॅनेजमेंट कॉलेज मधून एमबीए केलेले उमेदवार गूगल स्ट्रॅटजी एंड ऑपरेशंस मॅनेजर पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी गुगल कोटींच्या घरामध्ये वेतन देतो.
गुगल फायनांशिअल एनालिस्ट
फायनांस तसेच इकोनॉमिक्स क्षेत्रामध्ये अभ्यास असणार्या तज्ञ मंडळींना गुगल फायनांशिअल एनालिस्ट गुगल फायनांशिअल एनालिस्ट पदासाठी अर्ज करता येते. गुगल या पदासाठी कोट्यावधी रक्कम देते.