Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती; 145 पदांची सुवर्णसंधी

UIIC ने अप्रेन्टिस पदासाठी उमेदवारांची भरती सुरु केली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिक महितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 24, 2025 | 05:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) ने अप्रेंटिस पदांसाठी 145 जागांची अधिकृत भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अधिसूचना दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना 15 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ही भरती पदवीधर तरुणांसाठी एक चांगली संधी असून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

CPCB मध्ये विविध 69 पदांसाठी भरती; अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. शासन नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी नक्कीच साधावी.

भरती प्रक्रिया ही तीन टप्प्यात पार पडणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि शेवटी वैद्यकीय तपासणी होणार आहे. गुणवत्ता यादी ही शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात येणार नाही.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत अधिसूचना वाचून आपल्या पात्रतेची खात्री करून घ्यावी. त्यानंतर uiic.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि शेवटी अर्जाची छपाई काढून ठेवावी. अर्ज अपूर्ण असल्यास किंवा योग्य कागदपत्रे संलग्न नसल्यास अर्ज फेटाळण्यात येऊ शकतो.

तरुणांनो! लक्ष द्या! करिअर आणि आर्थिक व्यवस्थापनात चुकताय? तर नक्की वाचा

UIIC ही भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी आहे. या कंपनीत अप्रेंटिस म्हणून कार्य करणे म्हणजे एक नामांकित संस्थेचा अनुभव मिळवण्याची संधी. भविष्यातील नोकरीच्या संधींसाठी हा अनुभव उपयुक्त ठरू शकतो. म्हणूनच सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवून आपला अर्ज वेळेत भरावा.

महत्वाच्या तारखा:

  • अधिसूचना प्रसिद्ध: 15 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2025
अधिक माहितीसाठी uiic.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Web Title: Recruitment for apprentice posts in united india insurance company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • Government Job

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.