फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (Central Pollution Control Board – CPCB) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून, यामध्ये वैज्ञानिक, स्टेनोग्राफर, क्लर्क अशा एकूण ६९ पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून इच्छुक उमेदवार २८ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट cpcb.nic.in किंवा थेट app1.iitd.ac.in या पोर्टलवर जाऊन अर्ज करावा. सर्वप्रथम पोर्टलवर नोंदणी करावी, त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
सायंटिस्ट बी, असिस्टंट लॉ ऑफिसर, सिनियर टेक्निकल सुपरवाईजर, सिनियर सायन्टिफिक असिस्टंट, टेक्निकल सुपरवाईजर, असिस्टंट, अकाऊंट असिस्टंट, जुनिअर ट्रान्स्लेटर,Senior ड्राफ्ट्समन, ज्युनिअर टेक्निशिअन, लॅब असिस्टंट, अपर डिव्हिजन क्लार्क, डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच अशा अनेक विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव हे पदानुसार वेगवेगळे असणार आहेत.
या भरतीसाठी परीक्षा शुल्क देखील वेगवेगळ्या गटांनुसार निश्चित करण्यात आले आहे. एका तासाच्या परीक्षेसाठी सामान्य, ओबीसी आणि EWS उमेदवारांसाठी ₹५००, तर SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी ₹१५० शुल्क आहे. दोन तासांच्या परीक्षेसाठी सामान्य, ओबीसी आणि EWS उमेदवारांसाठी ₹१०००, तर SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी ₹२५० शुल्क आकारले जाईल.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे की अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२५ आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच, अर्ज भरल्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवावा. फसवणूक टाळण्यासाठी केवळ अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करावा व कोणत्याही एजंटकडे किंवा बनावट वेबसाइटकडे विश्वास ठेवू नये.
या भरती संदर्भात अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यावी. cpcb.nic.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांनी या भरतीच्या संदर्भात अधिक सखोल अभ्यास करावा आणि अर्ज प्रक्रियेस सुरुवात करावी.