फोटो सौजन्य - Social Media
सर्वोच्च न्यायालयात पर्सनल असिस्टंट पदासाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये विविध विभागातील पदांचा समावेश आहे. कोर्ट मास्टर, सिनिअर पर्सनल असिस्टंट तसेच पर्सनल असिस्टंटच्या पदासाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण १०७ जागांचा समावेश आहे. देशभरातील इच्छुक उमेदवारांना या भर्तीसाठी अर्ज करता येणार आहे. या रिक्त जागांमध्ये कोर्ट मास्टरच्या पदासाठी ३१ जागांचा समावेश आहे. सिनियर पर्सनल असिस्टंटच्या पदासाठी ३३ जागा रिक्त आहेत. पर्सनल असिस्टंट्च्या पदासाठी ४३ जागा रिक्त आहेत.
या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांना काही बाबी पात्र करणे गरजेचे आहेत. कोर्ट मास्टरच्या पदासाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांमध्ये काही कौशल्य असणे गरजेचे आहे. कोर्ट मास्टरच्या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यता प्राप्त संस्थानातून पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच इंग्लिश शॉर्टहॅन्डमध्ये उमेदवाराकडे १२० शब्द प्रति मिनिट लिहण्याचे कौशल्य हवे. तसेच ४० शब्द प्रति मिनिट अशी स्पीड असावी. उमेदकरांकडे किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.
सिनियर पर्सनल असिस्टंट पदासाठी अर्ज करता उमेदवारही पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच इंग्लिश शॉर्टहॅन्डमध्ये उमेदवाराकडे ११० शब्द प्रति मिनिट लिहण्याचे कौशल्य हवे. तसेच ४० शब्द प्रति मिनिट अशी स्पीड असावी. तसेच, पर्सनल असिस्टंट्च्या पदासाठी अर्ज करणारा उमेदवारही पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच इंग्लिश शॉर्टहॅन्डमध्ये उमेदवाराकडे १०० शब्द प्रति मिनिट लिहण्याचे कौशल्य हवे. तसेच ४० शब्द प्रति मिनिट अशी स्पीड असावी. एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. कोर्ट मास्टरच्या पदासाठी किमान ३० वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त ४५ वर्षे आयु असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. सिनियर पर्सनल असिस्टंट तसेच पर्सनल असिस्टंट्च्या पदासाठी अर्ज कर्त्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना तसेच OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १००० रुपये भरायचे आहे. तसेच अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराबन्ना अर्ज शुल्क म्हणून २५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.