फोटो सौजन्य - Social Media
द आर्मी वेल्फेअर एजुकेशन सोसायटी (AWES)ने निकाल जाहीर केला आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात या भरतीची सुरुवात करण्यात आली होती. मुळात, या परीक्षेच्या तारखांना प्रसिद्ध करण्यात आले आहे. PRT, PGT तसेच TGT च्या पदांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. awesindia.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. तसेच निकालाला डाउनलोड करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भारतीविषयक संपूर्ण माहिती:
AWES ने या भरतीला सुरुवात केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या १० तारखेला या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली होती. तसेच ऑक्टोबरच्या २७ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार होते. मोठ्या संख्येत उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले होते. तसेच २३ नोव्हेंबर आणि २४ नोव्हेंबरदरम्यान या भरती संदर्भात परीक्षा जाहीर करण्यात आली होती. आज या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
AWES OST 2024 भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांना ठराविक अटी आणि शर्ती पूर्ण करणे अनिवार्य होते. विविध पदांसाठी पात्रतेच्या अटी वेगळ्या होत्या, आणि त्या प्रत्येक पदासाठी स्पष्टपणे नमूद केल्या होत्या. PRT (प्राथमिक शिक्षक) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान पदवीधर असणे बंधनकारक होते. तसेच, उमेदवारांकडे बी.एड. (B.Ed.) किंवा डी.एड. (D.Ed.) या दोनपैकी कोणत्याही शिक्षणाची पदवी असणे अनिवार्य होते. या पात्रतेशिवाय, प्राथमिक शिक्षक पदासाठी अर्ज मान्य केला गेला नसता.
TGT (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) पदासाठी अर्ज करताना उमेदवारांकडे बी.एड. (B.Ed.) शिक्षणाची पदवी असणे अनिवार्य होते. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी लागणाऱ्या या पदासाठी उमेदवारांचे शिक्षणाचे प्रमाणपत्र आणि पात्रता ही मुल्यांकित केली गेली. PGT (पदव्युत्तर शिक्षक) पदासाठी, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बी.एड. (B.Ed.) पदवी प्राप्त करणे आवश्यक होते. पदव्युत्तर स्तरावर शिक्षण देणाऱ्या या पदासाठी, उमेदवारांना शिक्षण क्षेत्रातील सखोल ज्ञान आणि अध्यापन कौशल्य आवश्यक होते.
या भरती प्रक्रियेसाठी फक्त अर्ज करणे पुरेसे नव्हते. इच्छुक उमेदवारांना निवड प्रक्रियेतून यशस्वीरीत्या जावे लागले. यात लेखी परीक्षा, स्कोअरकार्डची पडताळणी, मुलाखत आणि अंतिम निवड प्रक्रिया यांचा समावेश होता. या सर्व टप्प्यांमधून ज्या उमेदवारांनी उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांनाच या भरती प्रक्रियेद्वारे नियुक्ती मिळू शकणार होती.
नियुक्तीच्या प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश