फोटो सौजन्य - Social Media
बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. शासन अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या रिक्त पदांमध्ये स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता तसेच स्थापत्य विभागातील दुय्यम अभियंता आणि यांत्रिकी व विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंताचा समावेश आहे. जवळपास 690 एक तर जागा या भरतीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. या संदर्भात जाहिरात लवकरच जाहीर करण्यात येईल.
हे देखील वाचा : दहावीच्या अभ्यासक्रमात करण्यात आला बदल; विषयांची संख्या वाढणार?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुरुवात 11 नोव्हेंबर 2024 पासून होणार आहे. तर उमेदवारांना 2 डिसेंबरपर्यंत त्या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. 11 नोव्हेंबर पर्यंत या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल. उमेदवारांनी त्याचा आढावा घ्यावा. ही माहिती बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. या जाहिरातीत, या भरती संबंधित सखोल माहिती नमूद असेल. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीविषयी जाणून घेण्यासाठी हे लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
मुंबई महानगरपालिकेच्या या भरती प्रक्रियेत स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंताच्या पदासाठी 250 रिक्त जागा आहेत तसेच स्थापत्य विभागातील दुय्यम अभियंताच्या पदासाठी 233 रिक्त जागा आहेत. यांत्रिकी व विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंताच्या पदासाठी 130 जागा रिक्त आहेत तर 77 जागा दुय्यम अभियंता पदासाठी रिक्त आहेत. स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता पदी निवड होणाऱ्या उमेदवारांना 41,800 रुपये 1,32,300 रुपये दरमहा वेतन देण्यात येईल.
हे देखील वाचा : आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; त्वरित करा अर्ज
यांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 41,800 रुपये 1,32,300 रुपये दरमहा वेतन पुरवण्यात येईल. स्थापत्य विभागातील दुय्यम अभियंता पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये पर्यंत दरमाह वेतन पुरवण्यात येईल. तरी यांत्रिकी विभागातील दुय्यम अभियंता पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 44,900 ते 1,42,400 रुपये वेतन पुरवण्यात येईल.