Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत मराठी शाळांचे अस्तित्व गायब? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुंबईतील शिवडी येथील मराठी शाळा ‘गायब’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 25, 2026 | 03:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत येणारी शिवडी येथील मराठी शाळा प्रत्यक्षात ‘गायब’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई विभागीय कार्यवाह तसेच माजी शिक्षण समिती सदस्य शिवनाथ दराडे यांनी महापौरांकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी लेखी तक्रारही सादर केली असून शिक्षण समिती अध्यक्षांनाही त्याची प्रत पाठवण्यात आली आहे.

Railway Recruitment : पश्चिम रेल्वेकडून ५ हजार ३४९ जागांसाठी मेगा भरती; दहावी आणि ITIमधील गुणांच्या आधारे होणार निवड

दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००९ मध्ये या शाळेत सुमारे २५० विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्याच वर्षी २ ऑक्टोबर वसाहतीच्या पुनर्वसन योजनेला सुरुवात झाली, मात्र सुरुवातीला या शाळेचा त्या योजनेत समावेश करण्यात आलेला नव्हता. नंतर सन २०१३ मध्ये कागदोपत्री शाळेचा पुनर्वसन योजनेत समावेश करण्यात आला. २०१५ पर्यंत रहिवाशांचे पुनर्वसन पूर्ण झाले आणि विकासकाने विक्रीसाठी टॉवरही उभारले.

दरम्यान, शाळा कायमस्वरूपी इमारत न देता तात्पुरत्या स्वरूपात ‘वन रूम किचन’मध्ये हलवण्यात आली. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कमी जागा उपलब्ध होती. परिणामी, पालकांनी मुलांना या शाळेत पाठवणे कमी केले आणि विद्यार्थ्यांची संख्या २५० वरून अवघ्या ६५ पर्यंत घसरली. अखेर हळूहळू ही मराठी शाळा पूर्णपणे बंद पडली.

दराडे यांनी आरोप केला आहे की, शाळा हडप करण्याच्या उद्देशानेच ही प्रक्रिया राबवली गेली. पुनर्वसन योजनेत शाळेसाठी जागा राखीव असतानाही प्रत्यक्षात शाळेची इमारत उभी करण्यात आली नाही. उलट टॉवर उभारून विक्रीला परवानगी देण्यात आली. यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी त्यांनी २६ डिसेंबर २०१६ रोजी शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या वेळी या विषयावर मोठा गदारोळ झाला आणि बैठक तहकूब करण्यात आली. नंतर चौकशीचे आदेश देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. २०१८ मध्ये देण्यात आलेले उत्तर दिशाभूल करणारे आणि भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न असल्याचे दराडे यांनी नमूद केले.

कॉपीमुक्त अभियानात नव्या उपक्रमाची भर! टोकन पद्धती… प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकाची नोंद

एकूणच, एका कार्यरत मराठी शाळेचे अस्तित्वच नष्ट झाल्याचा हा गंभीर प्रकार असून, यामागील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणामुळे महानगरातील मराठी शाळांच्या अस्तित्वाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Marathi schools disappear from existence in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • BMC
  • Marathi Schools

संबंधित बातम्या

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत
1

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव
2

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक
3

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.