Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Train Manager Salary & Vacancy: सरकारी नोकरी शोधताय? रेल्वेत ट्रेन मॅनेजर व्हा आणि कमवा बक्कळ पैसा!

How to Become Train Manager in Railway: भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी ग्रॅजुएट भरतीअंतर्गत गुड्स ट्रेन मॅनेजरच्या २,७५० जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, या पदासाठी ६ नोव्हेंबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 05, 2026 | 12:15 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • ट्रेन मॅनेजरला किती सॅलरी मिळते?
  • ट्रेन मॅनेजरची निवड कशी होते?
  • कोण अर्ज करू शकतो?
How to Become Train Manager in Railway: भारतीय रेल्वेत नोकरी करणे हे लाखो तरुणांचे स्वप्न असते. रेल्वेत अशी अनेक पदे आहेत, ज्यांच्यासाठी पदवीनंतर अर्ज करता येतो. यापैकीच एक पद म्हणजे ‘गुड्स ट्रेन मॅनेजर’ होय, ज्याला सामान्यतः ट्रेन मॅनेजर असेही म्हटले जाते. या पदावर काम करणारे कर्मचारी मालगाडीचे सुरक्षित संचालन आणि प्रवासादरम्यान आवश्यक रेल्वे प्रक्रियेची जबाबदारी सांभाळतात. विशेष म्हणजे या नोकरीत मूळ वेतनाशिवाय अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात. ट्रेन मॅनेजर बनण्यासाठी काय पात्रता लागते आणि निवड कशी होते, हे पाहुया.

ट्रेन मॅनेजरला किती सॅलरी मिळते?

रेल्वेच्या गुड्स ट्रेन मॅनेजर पदाचा समावेश ७ व्या वेतन आयोगाच्या पे लेव्हल-५ मध्ये करण्यात आला आहे. याची सुरुवातीची मूळ हमी किंवा बेसिक सॅलरी २९,२०० रुपये प्रतिमहिना असते. याशिवाय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि नियमानुसार इतर सुविधा मिळतात. या पदाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ‘रनिंग अलाउंस’ म्हणजेच किलोमीटरच्या आधारावर मिळणारा भत्ता होय. ट्रेन मॅनेजरची ड्युटी ट्रेनच्या संचालनाशी जोडलेली असल्यामुळे ड्युटी आणि ठरलेल्या नियमांनुसार हा भत्ता सुद्धा वेतनामध्ये समाविष्ट केला जातो. हे सर्व भत्ते मिळून एकूण सॅलरी बेसिक पे पेक्षा बरीच जास्त होते. मात्र, इन-हैंड सैलरी प्रत्येक कर्मचाऱ्याची पोस्टिंग, ड्युटी, भत्ते आणि कपातीनुसार वेगवेगळी असू शकते.

ट्रेन मॅनेजरची निवड कशी होते?

ट्रेन मॅनेजरची भरती रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) एनटीपीसी (NTPC) ग्रॅजुएट भरतीच्या माध्यमातून होते. निवड प्रक्रियेमध्ये सर्वात आधी संगणक आधारित परीक्षा म्हणजेच CBT-१ होते. यामध्ये सामान्य जागरूकता, गणित आणि जनरल इंटेलिजन्स व रिझनिंगवर प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा पास करणाऱ्या उमेदवारांना CBT-२ द्यावी लागते. त्यानंतर मेरीट आणि ठरलेल्या मानकांच्या आधारावर उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स आणि मेडिकल टेस्टसाठी बोलावले जाते.

गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी वेगळी टाइपिंग टेस्ट किंवा संगणक आधारित ॲप्टिट्यूड टेस्ट निर्धारित केलेली नाही. या पदासाठी A-२ मेडिकल स्टँडर्ड असणे आवश्यक असते, ज्यामध्ये डोळ्यांची दृष्टी आणि इतर आरोग्य तपासणीचे ठरलेले मापदंड पूर्ण करावे लागतात.

National Insurance Apprentice Jobs: सरकारी विमा क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

कोण अर्ज करू शकतो?

या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोणत्याही विषयातून पदवीधर झालेले उमेदवार ठरलेली वयोमर्यादा आणि इतर अटी पूर्ण करून अर्ज करू शकतात. नोव्हेंबर २०२६ मध्ये सुरू असलेल्या RRB NTPC ग्रॅजुएट भरती अंतर्गत गुड्स ट्रेन मॅनेजरच्या २,७५० जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२६ आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित RRB च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये वयोमर्यादा, मेडिकल मापदंड, आरक्षण आणि इतर अटी नक्की तपासून घ्याव्यात.

UPSC CSE 2026 Mains Result: सेवेत असताना पुन्हा यूपीएससी देता येणार का? रँक सुधारण्याबाबत ‘हे’ नवीन नियम करण्यात आले जारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुड्स ट्रेन मॅनेजर पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

    Ans: या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

  • Que: ट्रेन मॅनेजरची प्रारंभिक मूळ वेतन किती असते?

    Ans: ७ व्या वेतन आयोगाच्या पे लेव्हल-५ नुसार याची सुरुवातीची मूळ वेतन २९,२०० रुपये प्रतिमहिना असते, ज्यामध्ये विविध भत्ते जोडले जातात.

  • Que: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे?

    Ans: नोव्हेंबर २०२६ मध्ये सुरू असलेल्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०२६ आहे.

Web Title: Rrb ntpc goods train manager recruitment 2026 salary eligibility sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Government Job
  • High salary Job
  • Indian Railway

संबंधित बातम्या

SSB HC Ministerial Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CBT परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ तारखेला होणार टाइपिंग टेस्ट
1

SSB HC Ministerial Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CBT परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ तारखेला होणार टाइपिंग टेस्ट

Agniveer Service Extension: अग्निवीरांसाठी खुशखबर! सैन्यातील सेवा काळ ४ वरून ६ वर्षे वाढवणार?
2

Agniveer Service Extension: अग्निवीरांसाठी खुशखबर! सैन्यातील सेवा काळ ४ वरून ६ वर्षे वाढवणार?

UPSC CDS 1 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; ‘या’ आयआयटी इंजिनिअरने मारली बाजी!
3

UPSC CDS 1 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; ‘या’ आयआयटी इंजिनिअरने मारली बाजी!

Indian Railways: मोठा अपघात टळला! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले मालगाडीचे ७ डबे; बंगळुरू-चेन्नई रेल्वे वाहतूक विस्कळीत
4

Indian Railways: मोठा अपघात टळला! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले मालगाडीचे ७ डबे; बंगळुरू-चेन्नई रेल्वे वाहतूक विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.