Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTE Fee Reimbursement: आरटीई शाळांच्या शुल्क प्रतिपूर्ती प्रक्रियेला गती देण्यासाठी नवीन समितीची स्थापना

RTE Fee Reimbursement: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रलंबित प्रतिपूर्ती निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने आढावा समिती गठित केली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 08, 2026 | 02:42 PM
rte

rte

Follow Us
Follow Us:
  • आरटीई’चा शुल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न मार्गी लागणार
  • आरटीई २५ टक्के शुल्क प्रतिपूर्तीसाठी आढावा समिती
  • तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
सोनाजी गाढवे / नवराष्ट्र पुणे.

RTE Fee Reimbursement: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रलंबित प्रतिपूर्ती निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने आढावा समिती गठित केली आहे. शालेय शिक्षण विभागाने ७ सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी करून समितीच्या कार्यकक्षाही निश्चित केल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शुल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

‘आरटीई’ कायद्यानुसार २०१२-१३ पासून विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून संबंधित शाळांना केली जाते. मात्र, प्रतिवर्षी उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूद मागणीच्या तुलनेत अपुरी पडत असल्याने अनेक शाळांची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम प्रलंबित राहिली आहे. याप्रकरणी काही शाळांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या आहेत.

Sahitya Akademi Recruitment 2026 : १०वी-१२वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; साहित्य अकादमीत ‘या’ पदांची बंपर भरती

समिती संबंधित शाळांकडून प्रतिपूर्तीसाठी प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंतच्या प्रशासकीय प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा ठरवणार आहे. तसेच या कालमर्यादेचे पालन होते की नाही, याची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याबाबतही समिती निर्णय घेणार आहे.

शुल्क प्रतिपूर्तीसाठी सहा सदस्य समिती

शुल्क प्रतिपूर्तीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत आयुक्त (शिक्षण), राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, वित्त विभागाचे प्रतिनिधी, शिक्षण संचालक (प्राथमिक) आणि शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव यांचा समावेश आहे.

PM Internship 2026: एनएचपीसीमध्ये तरुणांसाठी सुवर्णसंधी; दरमहा मिळणार ११,००० रुपये स्टायपेंड

प्रवेशित विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय पडताळणी होणार

प्रतिविद्यार्थी दिली जाणारी प्रतिपूर्तीची रक्कम पुरेशी आहे का, प्रलंबित प्रतिपूर्तीशी संबंधित न्यायालयीन तसेच इतर प्रकरणांवर ठोस निर्णय, ‘आरटीई’अंतर्गत शाळांची संख्या, उपलब्ध जागा, प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या आणि जिल्हानिहाय नोंदींची पडताळणी केली जाणार आहे. आरटीई योजना सुरू झाल्यापासून तिच्या फलनिष्पत्तीचाही सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

Web Title: Rte fee reimbursement maharashtra review committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Admission News
  • Alert Schools

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Nagpur News : बनावट इंजिनीअरिंग प्रवेशाचा पर्दाफाश; २ प्रवेश रद्द
2

Nagpur News : बनावट इंजिनीअरिंग प्रवेशाचा पर्दाफाश; २ प्रवेश रद्द

काय सांगता? शाळेच्या आवारात आता मिळणार नाही चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि….? FSSAI चा मोठा निर्णय
3

काय सांगता? शाळेच्या आवारात आता मिळणार नाही चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि….? FSSAI चा मोठा निर्णय

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?
4

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.