Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JNV Admission 2027: नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

JNV Admission 2027: नवोदय विद्यालय समितीने (NVS) कक्षा ९ वी आणि ११ वी लॅटरल एंट्री प्रवेश २०२७ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून २२ ऑक्टोबर केली आहे. तरी लवकरात लवकर navodaya.gov.in वर अर्ज करा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 17, 2026 | 02:47 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

JNV Admission 2027:  नवोदय विद्यालय समितीने (NVS) जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या (JNVST) माध्यमातून शैक्षणिक सत्र २०२७-२८ साठी इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी अधिसूचना जारी केली आहे. नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू झाली होती, ज्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर होती. ती वाढवून आधी १५ ऑक्टोबर करण्यात आली होती, तर आता ही दुसरी संधी आहे जेव्हा जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशाची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवार इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या लॅटरल एंट्री प्रवेश २०२७ साठी २२ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करू शकतात.

नवोदयची प्रवेश परीक्षा कधी होणार?

इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय समितीकडून परीक्षा एप्रिल २०२७ मध्ये घेतली जाईल. यामध्ये रिक्त जागांवर निवड आणि परीक्षेच्या आधारावर प्रवेश दिला जाईल. इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारली जात नाही.

DMRC Recruitment 2026: दिल्ली मेट्रोमध्ये ७३ पदांसाठी भरती जाहीर! सुपरवायझर आणि इंजिनिअर पदांसाठी असा करा अर्ज

वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रे

NVS इयत्ता ९ वीच्या प्रवेशासाठी उमेदवारांचा जन्म १ मे २०१२ ते ३१ जुलै २०१४ दरम्यान झालेला असावा. NVS आपल्या नियमांनुसार इयत्ता ९ वी आणि ११ वीसाठी वयोमर्यादेत सूट देखील देईल. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे जन्म दाखला, इयत्ता ८ वी आणि १० वी पास केल्याची मार्कशीट, निवास प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत, ग्रामीण कोट्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जारी केलेले प्रमाणपत्र, वर्ग/प्रवर्ग प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता

जवाहर नवोदयमध्ये प्रवेशासाठी तेच उमेदवार अर्ज करू शकतात, जे २०२६-२७ या शैक्षणिक सत्रादरम्यान कोणत्याही सरकारी किंवा सरकारी मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता १० वीचे शिक्षण घेत आहेत. तसेच २०२६-२७ च्या आधी इयत्ता १० वीचे शिक्षण घेतलेले उमेदवार या प्रक्रियेसाठी पात्र असणार नाहीत. तसेच ९ वीच्या प्रवेशासाठी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्याच जिल्ह्याचे निवासी असणे बंधनकारक आहे, जिथे नवोदय विद्यालय स्थित आहे आणि त्यांनी त्याच जिल्ह्यातील कोणत्याही सरकारी किंवा सरकारी मान्यताप्राप्त शाळेतून ८ वी किंवा १० वी इयत्ता पास केलेली असावी.

CA Intermediate Result: सीए इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर; असा तपासा निकाल

९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी असा अर्ज करा:

1. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी नवोदय विद्यालय समितीच्या navodaya.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

2. त्यानंतर येथे ‘९ वी आणि ११ वी रजिस्ट्रेशन २०२७’ या लिंकवर क्लिक करा.

3. आता उमेदवारांना ‘रजिस्ट्रेशन’वर क्लिक करावे लागेल.

4. नोंदणी केल्यानंतर अर्ज भरा आणि फी जमा करा.

5. तसेच अर्ज पत्रामध्ये मागितलेले आवश्यक कागदपत्रे जसे की फोटो, सही इत्यादी अपलोड करा.

6. आता फॉर्म व्यवस्थित तपासून सबमिट करून टाका.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवोदय प्रवेशासाठी अर्ज करताना कोणती फी भरावी लागते का?

    Ans: नाही, इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारली जात नाही.

  • Que: नवोदयची प्रवेश परीक्षा कधी होणार आहे?

    Ans: जवाहर नवोदय समितीकडून इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी परीक्षा एप्रिल २०२७ मध्ये घेतली जाईल.

Web Title: Jnv admission 2027 class 9 11 extended last date navodaya sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Admission News
  • Admission Process
  • Jawahar Navodaya Vidyalaya

संबंधित बातम्या

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
1

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

NEET PG Counseling 2026: नीट पीजी समुपदेशनाची पहिली फेरी सुरू! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
2

NEET PG Counseling 2026: नीट पीजी समुपदेशनाची पहिली फेरी सुरू! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

CAT Exam 2026: कॅट परीक्षेच्या अर्जांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी घट! तरुण MBAकडे पाठ का फिरवत आहेत? जाणून घ्या
3

CAT Exam 2026: कॅट परीक्षेच्या अर्जांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी घट! तरुण MBAकडे पाठ का फिरवत आहेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.