
फोटो सौजन्य - Social Media
Ministry of Ayush अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या National Ayush Mission (NAM) अंतर्गत सेंट्रल प्रोग्राम मॅनेजमेंट युनिट (CPMU), आयुष भवन, नवी दिल्ली येथे 20 करारनिहाय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात, विशेषतः आयुष विभागात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. ही सर्व पदे करारनिहाय (Contractual) असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹35,000 ते ₹1,00,000 इतके एकत्रित मानधन (Consolidated Remuneration) दिले जाईल. समाधानकारक कामगिरीनुसार दरवर्षी 5% वाढही लागू असेल.
एकूण पदसंख्या : 20
उपलब्ध पदे पुढीलप्रमाणे:
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेगवेगळा आहे. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा AICTE मान्यताप्राप्त संस्थेची संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 21 ते 60 वर्षे ठेवण्यात आली आहे. पदानुसार 3 ते 15 वर्षांपर्यंतचा अनुभव आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्रातील, विशेषतः आयुष क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
निवड प्रक्रिया आणि अटी
निवड प्रक्रिया संयुक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे केली जाईल. ही नेमणूक पूर्णपणे करारनिहाय असून कायमस्वरूपी नियुक्तीचा कोणताही हक्क मिळणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना दरवर्षी 18 दिवसांची रजा (प्रो-राटा तत्त्वावर) मिळेल. शासकीय नियमांनुसार TA/DA लागू असेल; मात्र अतिरिक्त प्रवास किंवा वैद्यकीय भत्ता दिला जाणार नाही. आयकर आणि इतर कायदेशीर कपाती शासनाच्या नियमांनुसार करण्यात येतील.
अर्ज कसा करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी निर्धारित नमुन्यात अर्ज करून स्वत: प्रमाणित कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर पाठवावा:
पत्ता: Deputy Director, National Ayush Mission, Room No. 402-B, Ayush Bhawan, B-Block, GPO Complex, INA, New Delhi – 110023
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून एका महिन्याच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सविस्तर अटी व शर्ती (ToR) National Ayush Mission च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आरोग्य आणि आयुष क्षेत्रात उच्च पगारासह काम करण्याची इच्छा असलेल्या अनुभवी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. वेळेत अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा.