SBI(फोटो सौजन्य: social media)
SBI PO Recruitment 2025 Apply Online: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी उपडेट समोर आली आहे. SBI PO किंवा प्रोबेशनरी ऑफिसर साठी अर्ज मागवण्यात येत आहे. आज (१४ जुलै २०२५) अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आज स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून अर्ज प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा. तुम्ही sbi.co.in या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करू शकता. SBI POची प्रिलिम्स परीक्षा जुलै व ऑगस्ट २०२५ मध्ये घेतली जाणार आहे. उमेदवारांची निवड तीन टप्प्यांच्या परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
ई-कॉमर्स कंपनी Amazon मध्ये ‘या’ पदासाठी रिक्त जागा; पदवीधरांसाठी उत्तम संधी, पगार किती?
एकूण कीती जागा:
एकूण ५४१ पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यापैकी, ५०० पदे नियमित आहेत आणि ४१ पदे बॅकलॉग रिक्त जागा आहेत. त्यामधून
OBC : १३५
EWS : ५०
SC : ३७
ST : ७५
शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा: उमेदवार हा २१ ते ३० वर्षाचा उमेदवार असणे आवश्यक आहे. ज्याची वय २१ ते ३० पर्यंत आहे तोच व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकतो. उमेदवारांचे वय १ एप्रिल २०२५ या आधारावर मोजले जाईल. उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९९५ पूर्वी आणि १ एप्रिल २००४ नंतर झालेला नसावा.
एससी आणि एसटीला वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट असणार आहे तर ओबीसींना ३ वर्षांची सूट असणार आहे.
निवड प्रक्रिया काय?
प्रीलिम्स, मेन्स, सायकोमेट्रिक टेस्ट (ग्रुप एक्सरसाइज व इंटरव्यू).
प्रिलिम्समधील कामगिरीच्या आधारे उमेदवारांना मेन्ससाठी बोलावले जाईल. मेन्स उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना तिसऱ्या टप्प्यातील सायकोमेट्रिक चाचणीसाठी बोलावण्यात येईल.
वेतन किती?
मूळ वेतन 48,480/- (4 आगाऊ वाढीसह) स्केल – 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920, डीए, एचआरए आणि अनेक भत्ते.
अर्ज शुल्क-
जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस – ७५० रुपये
एससी, एसटी आणि दिव्यांग – शुल्क नाही.
SBI PO ला अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online
त्याचबरोबर, अंडर ग्रेजुएट आणि पोस्ट ग्रेजुएट विद्यार्थ्यांसाठी पेड इंटर्नशिपची उत्तम संधी समोर आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) एक नवीन आणि मोठा उपक्रम हाती घेतला आहे. ही इंटर्नशिप पेड राहणार आहे. या इंटर्नशिप अंतर्गत एकूण 165इंटर्न निवडले जातील. जर तुम्ही अंडर ग्रेजुएट (अभियांत्रिकी) किंवा पदव्युत्तर (इंजीनियरिंग / फिजिकल साइंस) विद्यार्थी असाल तर तुम्ही DRDO च्या या पेड इंटर्नशिपमध्ये सामील होऊ शकता. चला जाणून घेऊया या इंटर्नशिप बद्दलची अधिक माहिती.