केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १३ मे २०२५ रोजी दहावी आणि बारावीच्या मुख्य बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. बारावीत एकूण १४.९६ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीमध्ये २२.२१ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता नवीन सत्राच्या पुरवणी परीक्षेला सुरुवात होणार आहे. चला जाणून घेऊया पुरवणी परीक्षा कधी पासून आहे आणि आवश्यक सूचना काय आहे?
डेप्युटी मॅनेजर आणि मॅनेजर पदांची भरती सुरू; ‘या’ पदांसाठी मागितले अर्ज
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १०वी आणि १२विच्या पुरवणी परीक्षेला सुरवात होणार आहे. येत्या मंगळवारपासून ही परीक्षा सुरु होणार आहेत. बॉर्डरने वेळापत्रकही जाहीर केले आहे. उमेदवार https://www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर बघू शकणार. या पुरवणी परिसक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे.
दहावीची परीक्षा १५ जुलैपासून सुरु होणार असून २२ जुलैला संपणार आहे. ही परीक्षा सकाळी १०:३० वाजता सुरु होणार आणि दुपारी १:३० वाजेपर्यंत चालेल. काही विषयांची परीक्षा सकाळी १०:३० वाजता सुरू होईल आणि फक्त दुपारी १२:३० वाजेपर्यंत चालेल. पहिल्या दिवशी माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही परीक्षा असेल. तर बारावीची पुरवणी परीक्षा एका दिवसासाठी असेल. बारावीच्या विद्यार्थ्यांची सर्व विषयांची परीक्षा एकाच दिवसात पूर्ण होईल.
आवश्यक सूचना
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने काही आवश्यक सुचना दिल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विध्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे संप्रेषण उपकरण घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर कोणताही विध्यार्थी परीक्षा केंद्रात या उपकरणासह पकडला गेला तर UFM (अनफेअर मीन्स) नियमांनुसार संबंधित उमेदवारावर कठोर कारवाई केली जाईल.
MBA केल्याने मिळतो उत्तम पगार? काय आहे फायदे? जाणून घ्या
MBA केल्यानंतर सर्वात मोठा फायदा म्हणजे पगार. विशेषतः IIM सारख्या टॉप इन्स्टिट्यूटमधून एमबीए करणाऱ्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळते. उदाहरणच द्यायचं झालं तर, 2023 मध्ये IIM अहमदाबादच्या PGP विद्यार्थ्यांना सरासरी ₹34.36 लाख वार्षिक पॅकेज मिळालं, तर काहींना ₹1.15 कोटी इतकं पॅकेज मिळालं. या आकड्यांवरूनच एमबीएचं व्यावसायिक महत्त्व दिसून येतं.
कम्युनिकेशन आणि मॅनेजमेंट स्किल्स
एमबीए कोर्स दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कम्युनिकेशन स्किल, टीमवर्क, लीडरशिप, निर्णय क्षमता, प्रेझेंटेशन स्किल्स यांचा विकास होतो. या स्किल्समुळे विद्यार्थ्यांची पर्सनालिटी ओळखण्याजोगी बदलते आणि ते कोणत्याही प्रोफेशनल सिच्युएशनमध्ये सहज सामावून जातात.
नोकरीच्या अफाट संधी
एमबीए झाल्यानंतर मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशन्स, एचआर, डेटा अॅनालिटिक्स, कन्सल्टिंग यांसारख्या विविध क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी मिळतात. भारतातच नव्हे तर परदेशातही एमबीए प्रोफेशनल्सची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. कंपन्या अशा मॅनेजमेंट-तज्ज्ञ व्यक्तींना उच्च पगारासह कामावर घेतात.
आता हवेत उडायची वेळ आली ! Emirates Airline मध्ये नोकरी करण्याची हवाई संधी, पगार 2 लाखांपेक्षा जास्त