फोटो सौजन्य- सोशल मीडिया
SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्लर्क २०२६ साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे ज्युनियर असोसिएटच्या १,५३८ जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती प्रामुख्याने एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील बॅकलॉग रिक्त पदांसाठी काढण्यात आली आहे. पात्र उमेदवार ७ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारेच स्वीकारले जातील. या भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार या भरतीत केवळ एक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतील.
एसबीआयच्या या विशेष भरतीमध्ये एकूण १,५३८ रिक्त जागा आहेत. यामध्ये २०२ जागा एससी, १,२१९ जागा एसटी आणि ११२ जागा ओबीसी प्रवर्गासाठी आहेत. जनरल प्रवर्गातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत. राज्यवार पाहिल्यास, सर्वात जास्त गुजरातमध्ये २८९ जागा आहेत, त्यानंतर महाराष्ट्रमध्ये १६५, मध्य प्रदेशमध्ये १३४, झारखंडमध्ये १३३, कर्नाटकमध्ये १२०, ओडिशा मध्ये १११ आणि राजस्थानमध्ये १०६ जागा आहेत. आंध्र प्रदेशमध्ये ८८, तामिळनाडूमध्ये ६५, पश्चिम बंगालमध्ये ५५, जम्मू-काश्मीरमध्ये ४२ आणि आसाममध्ये ३९ जागा आहेत.
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम एसबीआयच्या वेबसाइटवर जावे.
2. त्यानंतर ‘करंट ओपनिंग’ (Current Openings) सेक्शनमध्ये संबंधित भरती निवडा.
3. आता रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा.
4. यादरम्यान शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
5. शेवटी निर्धारित फी भरून फॉर्म सबमिट करा.
या भरतीसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु त्यांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याचा पुरावा द्यावा लागेल. वयाची गणना १ एप्रिल २०२६ च्या आधारावर केली जाईल. उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे, म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९९८ ते १ एप्रिल २००६ दरम्यान झालेला असावा. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना एसबीआयच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल.
एसबीआय क्लर्क भरतीमध्ये निवडीसाठी तीन टप्पे असतील. सर्वात आधी पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि गरज भासल्यास स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी होईल. पूर्व परीक्षा सप्टेंबर २०२६ मध्ये होण्याचा अंदाज आहे, तर मुख्य परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२६ मध्ये घेतली जाऊ शकते. पूर्व परीक्षेत एकूण १०० गुणांचे वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) प्रश्न असतील आणि परीक्षेचा कालावधी १ तास असेल. चुकीचे उत्तर दिल्यास प्रश्नाच्या निर्धारित गुणांपैकी एक चतुर्थांश (१/४) भाग कापला जाईल.
एसबीआयने पूर्व परीक्षेमध्ये वेगवेगळ्या सेक्शनसाठी किमान उत्तीर्ण गुण (किमान क्वालीफाइंग मार्क्स) निर्धारित केलेले नाहीत. पूर्व परीक्षेचे गुण केवळ मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी वापरले जातील.






