Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; दहावीचा निकालानंतर आता…

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहिती व सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 10, 2026 | 12:52 PM
अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नियमित कॅप फेरी-१ चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. ८ मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध करून एकूण सात लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग १ भरून नोंदणी केली आहे.

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहिती व सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी २६ ते २८ मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर २९ मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असून, ३० मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

एक कोटींपर्यंतच्या विकासकामांना हिरवा कंदील; पुणे मनपा आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी support@mahafyjcad-missions.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार आहे.

कॅप फेरी २१ व २२ मे रोजी

प्रवेश प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींकरीता विशेष पाचवी फेरी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शून्य फेरीमध्ये ८ ते २० मे या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी व अर्जाचा भाग १ ऑनलाईन सादर करणे, तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे, हरकती/ दुरुस्ती मागण्या, सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणे, विविध कोट्यासाठी यादी देऊन रिक्त जागा प्रत्यार्पित करणे तसेच पहिल्या फेरीकरीता जागा प्रदर्शित करणे ही प्रक्रिया होईल.

नियमित कॅप फेरी-१ अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-१ मधील दुरुस्ती तसेच भाग-२ भरण्याची प्रक्रिया २१ आणि २२ मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कॅप फेरी-१ ची अलॉटमेंट प्रक्रिया २३ ते २६ मे दरम्यान पार पडणार असून, २६ मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे प्रवेशासाठी वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होणार असून, एसएमएसद्वारेही संदेश पाठविण्यात येणार आहेत.

Web Title: Schedule announced for class 11 online admissions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • 11th Admission

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.