Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी स्पेशल अभियान! मोठ्या संख्येने विद्यार्थी देणार परीक्षा

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार असून बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 24, 2026 | 04:30 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान, तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. दरम्यान, दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत.

Kolhapur News : दहावी, बारावी परीक्षेसाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या मागणीवर मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांची अदलाबदली होणार रद्द

यंदा राज्यभरातून दहावीच्या परीक्षेसाठी तब्बल १६ लाख १४ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ३२ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात एकूण ५११ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागातून परीक्षेला बसणार आहेत. मुंबई विभागातून ३ लाख ४९ हजार ६१२ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. त्याखालोखाल पुणे विभागातून २ लाख ७८ हजार ८०६, नाशिक विभागातून २ लाख ६ हजार ५२८, छत्रपती संभाजीनगर विभागातून १ लाख ९१ हजार ८८५, अमरावती विभागातून १ लाख ६५ हजार ३९८, नागपूर विभागातून १ लाख ५३ हजार ९३७, कोल्हापूर विभागातून १ लाख ३२ हजार ७९७, लातूर विभागातून १ लाख ११ हजार ५५ आणि कोकण विभागातून २५ हजार ७६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात ४३७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे विभागातून बारावीच्या परीक्षेसाठी सर्वाधिक २ लाख ६० हजार २६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, इतर विभागांतील नोंदणीची आकडेवारीही लक्षणीय असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. मागील वर्षांप्रमाणे यंदाही परीक्षा पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य मंडळातर्फे ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष पथके, भरारी पथकांची नियुक्ती, केंद्रनिहाय निरीक्षण, तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रांवर कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंडळाकडून देण्यात आला आहे.

TET परीक्षेत वाशिम जिल्ह्यातील ९६ टक्के शिक्षक अनुत्तीर्ण! गुरुजी झालं नापास, नाराजीचे वातावरण

परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रावर वेळेआधी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने सर्व तयारी पूर्ण केल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Special copyless campaign for 10th and 12th standard examinations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • 10th Board Exam
  • 12th

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.