यंदाच्या दहावी बारावी परीक्षेसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिपाई व अन्य कर्मचाऱ्यांचे अदलाबदली रद्द व्हावी, अशी मागणी महामंडळाच्या वतीने सातत्याने लावून धरण्यात आली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन याबाबत दोन दिवसात आदेश काढणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील पंडित, डी एस घुगरे, सचिव नंदकुमार सागर, विद्या समिती सचिव संजय कुमार झांबरे, महेंद्र गणपुले, कोल्हापूर विभाग अध्यक्ष बी बी पाटील, सुधाकर जगदाळे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार सचिव आर. वाय. पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष प्रसाद गायकवाड, सांगली जिल्हा सचिव संतोष नाईक, बेरड, अहमदनगर, पुंडलिक मेमाणे आदी उपस्थित होते.






