ssc (फोटो सौजन्य - pinterest)
मार्च महिन्यात दहावी आणि बारावीची परीक्षा संपली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात येते. नुकताच परीक्षा झाली असून आता विध्यार्थी निकालाची आतुरतेने वाट बघत आहे.
रेल्वे आणि एसबीआयमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी; काय आहे पात्रता?
मागिल वर्षी दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात आले होते. आता या वर्षी १५ मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एसएससी म्हणजे दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. मार्च महिन्यात ही परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे.
शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरु आहे. १५ मे पूर्वी दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. एसएससी परीक्षेचा हा निकाल राज्य मंडळाच्या इतिहासातील सर्वात जलद निकाल असेल, असं म्हटलं जात आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने परीक्षांचे आयोजन लवकर घेतले आणि या परीक्षांचा निकालही मे महिन्यातच जाहीर करणार असल्याची माहिती समोर आलीय. तसच जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षाही घेतल्या जाणार असल्याचं समजते. अनेक महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेतला जातो. तसच इन हाऊस अॅडमिशनही सुरु असतात. त्यामुळे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. कारण निकाल लवकर लागल्यानंतर त्यांना अॅडमिशनच्या प्रोससची तयारी करण्यास अधिक वेळ मिळू शकतो.
निकालाची प्रतिक्षा
परंतु, आता एसससी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एसएससी म्हणजे दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. मार्च महिन्यात ही परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे.
दोन शाळांची शासन मान्यता रद्द
दहावी, बारावी परीक्षेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने दोन शाळांची शासन मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अशाप्रकारची कारवाई करण्यात आली होती.
भारतीय सैन्य भरतीची शारीरिक चाचणी होणार का सोपी? सरकार ने दिले उत्तर….