ARMY (फोटो सौजन्य- pinterest)
भारतीय सैन्य भरतीसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीचे निकष शिथिल करण्याची कोणतीही योजना असल्याचा आरोप संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. द्रमुक खासदार कलानिधी वीरस्वामी यांनी विचारले होते की, भारतीय सैन्यात भरतीसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीचे निकष कमी करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का? त्यावर संरक्षण मंत्री संजय सेठने या वर लिखित उत्तर देत म्हंटले आहे कि भारतीय सेनेमध्ये असं कोणताच प्रस्ताव नाही पाठवला आहे. चला जाणून घेऊयात अग्नीवर भरतीचे सध्याचे काय नियम आहे.
शारीरिक चाचणी
ग्रुप १ – साडेपाच मिनिटात १.६ किलोमीटर धावावे लागेल. यासाठी ६० गुण देण्यात येणार. १० पुल-अप्स करावे लागतील. या साठी ४० गुण असेल.
ग्रुप २ – ५ मिनिटे ४५ सेकंदात १.६ किमी धावावे लागेल. त्याला ४८ गुण असतील. पुल अप्स ९ वेळा करावे लागतील ज्यासाठी ३३ गुण असतील.
ग्रुप ३ – ६ मिनिटांत १.६ किमी धावावे लागेल. त्याला ३६ गुण असतील. पुल अप्स ८ वेळा करावे लागतील ज्यासाठी २७ गुण असतील.
ग्रुप ४ – १.६ किमी ६ मिनिटे १५ सेकंदात धावावे लागेल. त्याला २४ गुण असतील. ७ वेळा पुल अप्स करावे लागतील ज्यासाठी २१ गुण असतील. जो व्यक्ती ६ पुल-अप करतो त्याला १६ गुण मिळतील.
वरील सगळ्या ग्रुपमध्ये फक्त दोन गोष्टी पात्रता असतील
यावर्षीच्या अग्निवीर भरतीमध्ये बदल करण्यात आले आहेत. जेणेकरून तंत्रज्ञ, व्यापाराच्या दोन श्रेणी आणि कार्यालय सहाय्यक किंवा स्टोअर कीपर यासारख्या पदांसाठी सक्षम उमेदवार वगळले जाऊ नयेत. यापूर्वी, गट-१ अंतर्गत, साडेपाच मिनिटांत १.६ किमी धावायचे होते. गट-२ अंतर्गत, एका व्यक्तीला ५ मिनिटे ४५ सेकंदात १.६ किमी धावायचे होते. या वेळेच्या मर्यादेनंतर शर्यत पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना बाहेरचा दरवाजा पाहावा लागायचा. ५.३० मिनिटांच्या श्रेणीतील तरुणांना सामान्य कर्तव्यासाठी ठेवण्यात आले. ज्यांनी ५.४५ मिनिटांत शर्यत पूर्ण केली त्यांना इतर पदांसाठी ठेवण्यात आले. आता यामध्ये दिलासा देण्यात आला आहे. दोन नवीन श्रेणी सुरू करण्यात आल्या आहेत. ६ मिनिटे आणि ६.१५ मिनिटे म्हणजेच, ५.३० मिनिटे ते ६.१५ मिनिटांच्या दरम्यान शर्यत पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची वेगवेगळ्या पदांसाठी निवड केली जाईल.