Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य कौशल्य विद्यापीठामुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध: कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामार्फत शिक्षकदिनानिमित्त गुरूवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्य विद्यापिठामुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होत आहे असे मत व्यक्त करत विद्यापिठाचे कौतुक केले.

  • By नारायण परब
Updated On: Sep 05, 2024 | 07:41 PM
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामार्फत शिक्षकदिनानिमित्त आयोजित गुरूवंदना कार्यक्रमामध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा, विद्यापिठातील शिक्षक वर्ग

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामार्फत शिक्षकदिनानिमित्त आयोजित गुरूवंदना कार्यक्रमामध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा, विद्यापिठातील शिक्षक वर्ग

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध नाविन्यपूर्ण कौशल्य विकसीत केले जात आहे आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहेत हे या विद्यापीठाचे यश आहे असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामार्फत शिक्षकदिनानिमित्त गुरूवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.यावेळी महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगूर प्रा.डॉ.अपूर्वा पालकर,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाईक,अतिरिक्त आयुक्त अनिल सोनावणे, वर्ल्ड ट्रेड सेंटर चे चेअरमन विजय कलंत्री,रजिस्टार राजेंद्र तलवारे,अमृत योजनेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यावेळी उपस्थित होते.

विद्यापीठ आणि खासगी संस्थामध्ये समन्वय उत्तम त्यामुळे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू या आदर्श गुरू आहेत नुकत्याच झालेल्या जळगाव येथील कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ.अपूर्वा पालकर यांच्या कार्याचा उल्लेख केला आहे.आजच्या काळात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे.सरकारी क्षेत्रांत रोजगाराच्या मर्यादित संधी उपलब्ध आहेत.तर खासगी क्षेत्रांमध्ये विकसित कौशल्याची आवश्यकता असते. विद्यापीठ आणि खासगी संस्थामध्ये समन्वय उत्तमरीत्या साधला जात आहे त्यामुळे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. कौशल्य विद्यापीठाचे काम उत्तमरीत्या होत आहे. जे विद्यार्थी कौशल्य विद्यापीठामधून शिकून पुढे जाणार आहेत त्या सर्वांना मी हेच सांगेन, आतापासूनच स्टार्ट अप साठी पुढील संधीचा विचार आणि आखणी करायला लागा. काळानुरूप कौशल्य विकसित करा असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

नावीन्यपूर्ण दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रशिक्षण खूप महत्वाचे

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आय सी टी) तसेच मराठी विज्ञान परिषदेचे शास्त्रज्ञ डॉ.जे. बी. जोशी म्हणाले की, देशाचे उत्पादन वाढण्यामध्ये सेवा क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे.जगात एकूण दीड कोटीहून अधिक उद्योग आहेत.आपल्या देशाला दहा कोटी नोकऱ्यांची आवश्यकता आहे. भारताने नवनिर्मिती करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यामुळे तरुणांना काम मिळेल आणि देश विकासाकडे वाटचाल करेल. शेतीमध्ये कमी धारण क्षेत्रामध्ये अधिकाधिक उत्पन्न कसे घेता येईल यावर नावीन्यपूर्ण विचार केला तर शेतकऱ्यांना मदत होईल.आपल्यासमोर असणाऱ्या प्रश्नांवरती नाविन्यपूर्ण उत्तर काढण्याने अनेक स्टार्टअप सुरू होतील तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.नावीन्यपूर्ण दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे.

आदर्श शिक्षक,फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यी व विविध संस्थाचा सत्कार

कौशल्य विद्यापीठ विविध संस्थांसोबत जोडले गेलेले असून विद्यापीठाने मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या संबंधित कौशल मित्रा,संचीती हेल्थकेअर अकॅडमी, झुडियो, मॅकडोनाल्ड, वर्ल्ड ट्रेड सेंटर यांच्या प्रतिनिधींचा या समारंभ सत्कार करण्यात आला. तसेच विदयार्थ्यांच्या कौशल्य वृध्दीसाठी कार्यरत असलेल्या अमर सक्सेना, आदिती काळे, भूपेंद्र कौर, सुनील जोशी, प्रतीक नार्वेकर व वसुधा जाधव शिक्षकांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. अमृत उद्योगिकता विकास योजनेअंतर्गत निवडक १५ स्टार्टअपला प्रति तीन लाख रुपये विद्यावेतन पत्र यावेळी वितरित केले गेले.नरवाडे कट्यालिस्ट ,कॅश फ्री मेट्रो, माय बोर्ड यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ यांनी सामंजस्य करार केले.

Web Title: State skill university provides more employment opportunities skill development minister mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 07:40 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यासाठी राज्य शासन सहकार्य करणार”; देवेंद्र फडणवीस
1

Devendra Fadnavis: “झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यासाठी राज्य शासन सहकार्य करणार”; देवेंद्र फडणवीस

Nagpur: रोकड जप्त, तपास सुरू; बावनकुळेंच्या अचानक तपासणीत लाचखोर अधिकाऱ्याचे पितळ उघडे
2

Nagpur: रोकड जप्त, तपास सुरू; बावनकुळेंच्या अचानक तपासणीत लाचखोर अधिकाऱ्याचे पितळ उघडे

Mangal Prabhat Lodha: राज्यात ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमा’ची सुरूवात, PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
3

Mangal Prabhat Lodha: राज्यात ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमा’ची सुरूवात, PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

मनोज जरांगेंनी बोलताना मर्यादा पाळावी, आरक्षणाचा लढा हा…; काँग्रेसच्या नेत्याने सुनावले खडेबोल
4

मनोज जरांगेंनी बोलताना मर्यादा पाळावी, आरक्षणाचा लढा हा…; काँग्रेसच्या नेत्याने सुनावले खडेबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.