Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career News : अल्पसंख्याक विकास विभागाचे निर्देश! ‘विद्यार्थ्यांकडून ‘या’ गोष्टीची सक्ती करू नये’

राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्र किंवा दाखल्याची सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 30, 2026 | 06:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्र किंवा दाखल्याची सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत. शासनाने विहित केलेले वैध पुरावे ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यास सांगितले असून, केवळ प्रमाणपत्राच्या अभावी कोणताही पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहेत.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी विरारच्या विवा महाविद्यालयात खास उपक्रम! द्वारकाधीश मंदिराजवळ केले वृक्षारोपण

महाराष्ट्र शासनाने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराष्ट्रीयन (पारसी), जैन आणि ज्यु या सात धार्मिक समुदायांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता दिली आहे. मात्र, राज्य सरकारकडून या समुदायातील व्यक्तींना स्वतंत्र वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिले जात नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना काही शैक्षणिक संस्थांकडून अशा प्रमाणपत्राची मागणी केली जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने ही स्पष्टता देण्यात आली आहे.

१ जुलै २०१३ च्या शासन निर्णयानुसार शाळा सोडल्याचा दाखला (एलसी), प्रवेश नोंदवही किंवा शालेय अभिलेखातील धर्म अथवा मातृभाषेची नोंद, संबंधित धर्मप्रमुख किंवा नोंदणीकृत संस्थेचे प्रमाणपत्र (उदा. बाप्तिस्मा किंवा दीक्षा प्रमाणपत्र) अथवा पालकांचे शपथपत्र यापैकी कोणताही एक पुरावा अल्पसंख्याक असल्याचा वैध पुरावा म्हणून स्वीकारावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

NEET UG PreparationTips: नीटमध्ये टॉपर बनण्यासाठी कोणत्या विषयावर जास्त भर द्यावा? जाणून घ्या एका क्लिकवर..

या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, व्यवसाय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण व संशोधन तसेच आयुर्वेद संचालनालयांना २१ जुलै २०२६ रोजी पुन्हा सूचना देण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडे चवरे यांनी सर्व अनुदानित व विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांनी शासनाच्या आदेशांचे पालन करून कोणताही पात्र अल्पसंख्याक विद्यार्थी केवळ वैयक्तिक प्रमाणपत्र नसल्यामुळे प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Web Title: Students should not be compelled to provide a minority certificate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर
1

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती
2

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.