Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sundar Pichai : सुंदर पिचाई यांचा आयआयटी खरगपूर ते गुगलपर्यंतचा प्रवास वाचा एका क्लिकवर..

Sundar Pichai IIT Kharagpur : सुंदर पिचाई यांनी आयआयटी खरगपूरमधील जुन्या आठवणी, तंत्रज्ञानाचा प्रवास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) भविष्याबद्दल मांडलेले महत्त्वपूर्ण विचार स्पष्ट केले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 03, 2026 | 04:13 PM
SUNDAR PICHAI

SUNDAR PICHAI

Follow Us
Follow Us:

Sundar Pichai IIT Kharagpur : आयआयटी खरगपूरच्या ७५ वर्षांच्या वारशाचा उत्सव साजरा करण्यात आला या दरम्यान  सुंदर पिचाई यांनी याबद्दल खास   व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, आयआयटी खरगपूरमध्ये घालवलेल्या विद्यार्थी जीवनातील त्यांच्याकडे अनेक सुखद आठवणी आहेत. त्यांनी हॅरीज् (Harry’s) मध्ये जेवण्यापासून ते इल्लू फेस्टिव्हल, B308 मध्ये रात्री अभ्यास करणे आणि आपल्या विंगमेट्ससोबत झालेल्या मैत्रीचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी अशा प्राध्यापकांना केले, ज्यांच्यामुळे त्यांच्या जीवनावर दीर्घकाळ प्रभाव पडला. त्यांच्या मते, हे अनुभव हळूहळू त्यांच्या जीवनाची दिशा ठरवणारे ठरले.

टेक्नोलॉजीचा प्रवास नेमका कुठून सुरू झाला?

पिचाई यांनी सांगितले की, आयआयटी खरगपूर ही त्यांच्यासाठी केवळ अभ्यासाची जागा नव्हती. याच कॅम्पसमध्ये त्यांची भेट त्यांची पत्नी अंजली हिच्याशी झाली आणि याच ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा प्रोग्रामिंग शिकले. त्यांनी हेदेखील म्हणाले की, कॅम्पसमध्ये कॉम्प्युटर वापरण्याच्या सुरुवातीच्या काळात ते फ्लॉपी डिस्क घेऊन फिरायचे. त्यांच्या मते, या छोट्या-छोट्या अनुभवांमुळेच त्यांना पुढे टेक्नॉलॉजीच्या जगतात पुढे जाण्याचा मार्ग मिळाला.

आयआयटीने जग पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला?

पिचाई यांनी आयआयटी खरगपूरच्या शिक्षणाला आपल्यासाठी एक खास भेटवस्तू म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, या संस्थेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी भारत आणि जगभरात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या मते, आयआयटी खरगपूरने जग पाहण्याचा आणि त्यात आपले योगदान देण्याचा त्यांचा दृष्टिकोन विकसित केला. हीच विचारसरणी त्यांच्या गुगलपर्यंत पोहोचण्याच्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचवण्याच्या उद्देशातही दिसून येते.

पुढील टप्प्यात एआयची (AI) भूमिका काय असेल?

पिचाई यांच्या मते, येणाऱ्या काळात आयआयटी खरगपूरसारख्या संस्थांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरेल, कारण जग टेक्नॉलॉजीच्या पुढच्या लाटेच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी सांगितले की, भारतात सतत असे नवीन प्रयोग आणि इनोव्हेशन होत आहेत, ज्याचा फायदा संपूर्ण जगाला मिळू शकतो.

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या

एआय सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचेल?

पिचाई यांनी सांगितले की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही क्षमता आणखी वाढवण्यास मदत करू शकते. त्यांनी आगामी पाच वर्षांबद्दल सांगितले की, एआय आता केवळ प्रयोगशाळा आणि सुरुवातीच्या युजर्सपुरते मर्यादित न राहता विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या हातात पोहोचेल. यामध्ये आरोग्य कर्मचारी, सरकारी अधिकारी, शेतकरी, डेव्हलपर आणि उद्योजक यांचा समावेश आहे. एआय लोकांना आपले काम अधिक चांगल्या आणि प्रभावी पद्धतीने करण्यास मदत करू शकते, असा त्यांचा विश्वास आहे.

विद्यार्थ्यांसाठी एआय इतके महत्त्वाचे का आहे?

पिचाई यांनी सांगितले की, एआयमध्ये होत असलेल्या प्रगतीचा मोठा वाटा विद्यार्थ्यांपासूनही प्रेरित होत आहे. त्यांनी यावर्षी दिल्लीत ‘एआय इम्पॅक्ट समिट’ दरम्यान भारताच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या जेमिनी स्टुडंट ॲम्बेसिडर्स (Gemini Student Ambassadors) सोबत झालेल्या भेटीची आठवण काढली. त्यांच्या मते, या विद्यार्थ्यांमध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांचे जीवन सुधारण्याबाबत ज्या प्रकारचा उत्साह दिसून आला, त्याने त्यांना भविष्याबद्दल अधिक आशावादी बनवले.

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल

आयआयटी खरगपूरचे भविष्य काय असू शकते?

आयआयटी खरगपूरने पिचाई यांच्या संदेशाला संस्थेच्या जागतिक प्रभावाचे आणि शिक्षण, इनोव्हेशन व टेक्नॉलॉजीच्या शक्तीचे उदाहरण म्हटले आहे. संस्थेने म्हटले आहे की, ७५ वर्षांच्या वारशाचा उत्सव साजरा करताना आता नवीन विचारांना प्रोत्साहन देणे, नव्या पिढ्यांना प्रेरित करणे आणि भारत व जगासाठी उपयुक्त सोल्यूशन्स तयार करणे हा आमचा उद्देश आहे. कॉलेजचे शिक्षण, सुरुवातीचा अनुभव आणि सतत शिकण्याची सवय कशा प्रकारे दीर्घ करिअरचा पाया बनू शकते, याचे उत्तम उदाहरण पिचाई यांची ही कथा दाखवते.

Web Title: Sundar pichai iit kharagpur journey and ai future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • ai
  • google ceo
  • IIT
  • Sundar Pichai

संबंधित बातम्या

AI study app: कोडिंग न येताही विद्यार्थिनीने बनवले AI स्टडी ॲप, अवघ्या ३ दिवसांत कमावले लाखो रुपये
1

AI study app: कोडिंग न येताही विद्यार्थिनीने बनवले AI स्टडी ॲप, अवघ्या ३ दिवसांत कमावले लाखो रुपये

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!
2

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode
3

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
4

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.