फोटो सौजन्य - Social Media
तामिळनाडू राज्य मंडळाने (TNDGE) TN HSE (+1) इयत्ता ११ वीचा निकाल १६ मे २०२५ रोजी जाहीर केला आहे. अधिकृत माहितीनुसार, निकालाची लिंक दुपारी २ वाजता अधिकृत वेबसाइट्सवर सक्रिय करण्यात आली आहे. [dge.tn.gov.in](https://dge.tn.gov.in) आणि [tnresults.nic.in](https://tnresults.nic.in). यंदा एकूण ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जे विद्यार्थी इयत्ता ११ वीच्या बोर्ड परीक्षेला बसले होते, ते आपला रोल नंबर आणि रोल कोड वापरून स्कोअरकार्ड डाऊनलोड करू शकतात. निकाल केवळ अधिकृत वेबसाइट्सवरच नव्हे, तर DigiLocker या प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना Aadhaar क्रमांक लिंक असलेल्या खात्यात लॉग इन करून डिजिटल मार्कशीट मिळवता येईल.
तात्पुरत्या मार्कशीटमध्ये खालील माहिती असेल.
ही मार्कशीट केवळ तात्पुरती असून, अंतिम प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित शाळेमधून घ्यावं लागेल. इयत्ता ११ वीची लेखी परीक्षा ५ मार्च ते २७ मार्च २०२५ दरम्यान झाली होती. प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २१ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पार पडली होती. २०२४ मध्ये निकाल १४ मे रोजी लागला होता. तेव्हा एकूण ८,११,१७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ज्यात ४,२६,८२१ मुली आणि ३,८४,३५१ मुले होती. एकूण यशाचे प्रमाण ९१.१७% होते. यापैकी मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९४.६९%, तर मुलांचं ८७.२६% होतं. यंदा निकालात थोडी सुधारणा झाल्याचं स्पष्ट होतं. तामिळनाडूमधील शिक्षणाच्या दर्जात सुधारणा होत असल्याचंही या निकालावरून दिसून येतं.
निकाल पाहण्यासाठी वेबसाइट्स:
विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली गुणपत्रिका डाऊनलोड करून, मूळ मार्कशीटसाठी शाळेशी संपर्क साधावा.