रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत असिस्टंट लोको पायलट (ALP) या पदासाठी ९९७० रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख पूर्वी ११ मे २०२५ होती, मात्र ती आता वाढवून 19 मे 2025 करण्यात आली आहे. तसेच, शुल्क भरणे व अर्जात सुधारणा करण्यासाठी 14 मे ते 22 मे 2025 पर्यंत सुधारणा विंडो उपलब्ध असेल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹24,904 इतकी इन-हँड पगार मिळेल.
या भरतीअंतर्गत रिक्त जागांचे विभागनिहाय विवरण असे आहे:
मध्य रेल्वे (376), पूर्व मध्य रेल्वे (700), पूर्व तटीय रेल्वे (1461), पूर्व रेल्वे (768), उत्तर मध्य रेल्वे (508), उत्तर पूर्वी रेल्वे (100), पूर्वोत्तर सीमांत रेल्वे (521), उत्तर रेल्वे (679), उत्तर पश्चिम रेल्वे (989), दक्षिण मध्य रेल्वे (568), दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (796), दक्षिण पूर्वी रेल्वे (510), दक्षिण रेल्वे (759), दक्षिण पश्चिम रेल्वे (885) आणि मेट्रो रेल्वे कोलकाता (225).
या भरतीसाठी अर्ज 12 एप्रिल 2025 पासून सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2025, शुल्क भरण्याची अंतिम तारीख 21 मे 2025 असून, 22 ते 31 मे 2025 या कालावधीत अर्जात सुधारणा करता येणार आहे. परीक्षेची तारीख आणि निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. परीक्षेपूर्वी 4 दिवस आधी प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
शैक्षणिक पात्रतेच्या अटींनुसार उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये (फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक इ.) ITI प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अथवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा घेतलेला असावा. वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे असून, आरक्षित वर्गांसाठी शासन नियमानुसार सवलत देण्यात येईल. अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी व EWS वर्गासाठी ₹500 आहे. तर अनुसूचित जाती-जमाती, ईबीसी, महिला व थर्ड जेंडर वर्गासाठी ₹250 आहे. ही भरती प्रक्रिया CBT परीक्षा, अप्टिट्यूड टेस्ट व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधारे होणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी नक्कीच हातातून जाऊ देऊ नये.