
फोटो सौजन्य - Social Media
संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे. शिक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी (NSKTU), तिरुपती या केंद्रीय विद्यापीठात शिक्षक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही अधिसूचना १८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असून, इच्छुक उमेदवारांना एकूण १२ प्राध्यापक पदांसाठी थेट भरतीद्वारे अर्ज करता येणार आहेत.
या भरतीत असोसिएट प्राध्यापक आणि असिस्टंट प्राध्यापक पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही पदे संस्कृत व संबंधित अभ्यास शाखांमध्ये उपलब्ध आहेत. योग विज्ञान, आगम, न्याय, विश्विष्टाद्वैत वेदांत, साहित्य, ज्योतिष व वास्तु, संशोधन आणि प्रकाशन, व्याकरण, शिक्षण आणि शब्दबोध प्रणाली व संगणकीय भाषाविज्ञान या विषयांमध्ये भरती केली जाणार आहे. त्यापैकी
एकूण १२ रिक्त पदे विविध आरक्षण श्रेणींनुसार भरली जाणार आहेत.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी www.nsktu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले प्रॉस्पेक्टस काळजीपूर्वक वाचावे. अर्ज https://curec.samarth.ac.in या पोर्टलवर भरता येईल. सामान्य, OBC आणि EWS पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹८०० आहे, तर SC/ST/PwBD आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनाशुल्क आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) अशी आहे. तसेच अर्जाची हार्ड कॉपी व आवश्यक कागदपत्रे १० डिसेंबर २०२५ (सायं. ५:३० वाजेपर्यंत) रजिस्टार, नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी, तिरुपती – ५१७५०७, आंध्र प्रदेश या पत्त्यावर पाठवावी लागतील.
संस्कृतच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक शिक्षणाशी जोडून आपली कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांसाठी ही भरती एक उत्तम संधी आहे.