फोटो सौजन्य - Social Media
ग्रेड A पदासाठी ही भरटीओ आयोजित करण्यात आली असून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेव्याच्या आहेत. नाबार्डच्या या भरतीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील जसे आर्थिक, कृषी, अभियांत्रिकी, HR तसेच राजसभा विभागातील भरती आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी निकष वेगवेगळे निश्चित करण्यात आले आहे. आर्थिक विभागासाठी कृष्ण विभागापेक्षा निकष वेगळे आहेत. चला तर मग त्यावर नजर टाकून घेऊयात.
जर तुम्ही आर्थिक विभागात नोकरी करू इच्छिता तर चारटेड अकाउंटंट पदासाठी भरती निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी उमेदवार पदवीधर हवा तसेच ICAI मेंबर असावा. तसेच उमेदवाराकडे BBA/BMS (Finance/Banking), MBA/PGDM (Finance), Bachelor of Financial & Investment Analysis मध्ये शिक्षण असावे. कम्प्युटर क्षेत्रात काम करू पाहणारे उमेदवार Bachelor’s or Master’s in CS, IT, Electronics, Data Science, ML, AI या विषयांमध्ये शिक्षित असावा.
उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जनरल कॅटेगरीमधून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८०० रुपये निश्चित करण्यात आला आहे. तसेच ही संख्या SC/ST/PWBD साठी १५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करताना www.nabard.org. या संकेतस्थळाला भेट द्या.






