MBA आणि मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातील महत्वाची परिक्षा म्हणजे CAT. CAT म्हणजे Common Admission Test. कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2025) जसजशी जवळ येते तसतसे विद्यार्थ्यांवर दबाव वाढत जातो. कित्येक दिवसांचे कठोर परिश्रम, सततचा सराव आणि मॉक टेस्टनंतरही, शेवटच्या काही आठवड्यांमध्ये एक छोटीशी चूक परीक्षेच्या निकालावर परिणाम करू शकते. म्हणूनच परिक्षेच्या काळात काय करावं हे जाणून घेऊयात.
सर्वात आधी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. परिक्षेच्या काळात तणावात न राहता पेपर योग्यरितीने सॉल्हव करता यायला हवं.
विद्यार्थ्यांना अनेकदा असे वाटते की ते जितक्या जास्त मॉक टेस्ट देतील तितके ते चांगले प्रदर्शन करतील.परंतु दररोज एक किंवा दोन मॉक टेस्ट घेतल्याने थकवा येऊ शकतो आणि अचूकता कमी होऊ शकते. वारंवार मॉक टेस्ट घेतल्याने विश्लेषणासाठी वेळ मिळत नाही, ज्यामुळे सुधारणा होण्यास अडथळा येतो.आठवड्यातून २-३ मॉक टेस्ट घ्या आणि प्रत्येक टेस्टनंतर तुमच्या उत्तरांचे सखोल विश्लेषण करा. मॉकमध्ये गुण महत्वाचे नाही तर तुम्हाला परिक्षेची सवय होणं गरजेचं आहे.
बरेच विद्यार्थी शेवटच्या क्षणी नवीन काही शिकण्यात अडकतात आणि जुन्या संकल्पना सुधारणे विसरतातपरीक्षेदरम्यान एखादा फॉर्म्युला विसरणे ही एक चूक महागात पडू शकते. दररोज 20-30मिनिटे तुमच्या नोट्स वाचा आणि सराव करा. नवीन गोष्टी शिकण्याऐवजी जुन्या गोष्टी पुन्हा शिका. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल.
प्रत्येक मॉक टेस्टचा पॅटर्न वेगळा असतो. गुणांमधील चढ-उतार सामान्य आहेत, परंतु बरेच उमेदवार यामुळे भारावून जातात आणि सतत त्यांची रणनीती बदलतात. गुणांवर नाही तर सातत्यतेवर लक्ष केंद्रित करा.जर तुमची अचूकता आणि वेळेचे व्यवस्थापन सुधारत असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात.






