Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रंगीत’च्या पहिल्या SEEK शिखर परिषदेत शिक्षकवर्ग एकत्र; भावी वर्गासाठी नवे विचार

'रंगीत'च्या पहिल्या SEEK शिखर परिषदेत शिक्षकवर्ग एकत्र आले आहेत. तसेच भावी वर्गांसाठी काही विचारांचा आराखडाही आखला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 01, 2025 | 07:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पारंपरिक शिक्षणपद्धतीत बदल घडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी अधिक सज्ज करण्यासाठी ‘रंगीत’च्या पहिल्या एसईईके शिखर परिषदेचे आयोजन कोहिनूर बँक्वेट्स, दादर येथे करण्यात आले. प्रथम मुंबई एज्युकेशन इनिशिएटिव्ह आणि ओमनीअॅक्टिव्ह इम्प्रूव्हिंग लाइव्हज फाऊंडेशन यांच्या सहकार्याने, तसेच निर्लॉन लिमिटेडच्या मदतीने ही परिषद पार पडली. या परिषदेत मुंबईतील 100 हून अधिक शिक्षक, समुपदेशक आणि शिक्षणाधिकारी सहभागी झाले होते. हे सर्वजण रंगीतने विकसित केलेल्या सामाजिक, भावनिक आणि पर्यावरणीय ज्ञानावर आधारित एसईईके अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहेत किंवा त्याची तयारी करत आहेत.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्राचे अपार कष्ट! आधी बनली IPS मग झाली IAS

दिवसाची सुरुवात खेळकर ओळखपत्रांमधून झाली, ज्यामध्ये प्राण्यांची चित्रं वापरून सहभागींचे समूह ठरवले गेले. यानंतर डॉ. प्राची जांभेकर (उपआयुक्त, शिक्षण – BMC) यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. परिषदेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे “मुलांना भविष्यासाठी कसे तयार करू?” या विषयावर आधारित परिसंवाद. या सत्रात शिक्षणतज्ज्ञ सोनिया रेलिया, मुख्याध्यापक अजय सिंग, समुपदेशक डेलनाज डेलिना आणि ‘प्रथम’ संस्थेच्या फरीदा लांबे यांनी सहभाग घेतला. यामध्ये शिक्षकांनी त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांमधील भावनिक आणि वर्तनात्मक समस्यांवर प्रकाश टाकला. शिक्षकांसाठी सुरक्षित आधारव्यवस्था किती आवश्यक आहे, यावरही भर दिला गेला.

एक विशेष उपक्रम म्हणून, व्यावसायिक खेळाडूंशी काम करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ मोन ब्रोकमन यांच्या सहकार्याने शिक्षकांसाठी एक चॅटबॉट विकसित केल्याची घोषणा झाली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘ट्री ऑफ चेंज’ सत्रात प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी अधिक सहृदयी वातावरण तयार करण्यासाठी वैयक्तिक वचनबद्धता दिली.

RRC ER अपरेंटिस भरती 2025: ईस्टर्न रेल्वेत 3115 पदांसाठी सुवर्णसंधी

‘रंगीत’च्या सहसंस्थापक सिमरन मुलचंदानी म्हणाल्या, “जेव्हा आपण शिक्षकांना संधी देतो विचार करण्याची, तेव्हा खरे परिवर्तन घडते.” तर करिश्मा मेनन यांनी, “शिक्षक हे मार्गदर्शकच नव्हे, तर विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ असतात,” असे सांगितले. ही परिषद शिक्षकांसाठी समर्पित एसईईके समुदायाच्या निर्मितीचा आरंभबिंदू ठरली. भविष्यातील पिढीसाठी शिक्षण अधिक समंजस, संवेदनशील आणि काळानुरूप होण्यासाठी ही दिशा महत्त्वपूर्ण ठरेल.

Web Title: Teachers gather at the first seek summit of rangit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 07:24 PM

Topics:  

  • education news
  • job seekers

संबंधित बातम्या

Iran–US–Israel war: भारतीय विद्यार्थी ईराणमध्ये काय शिकायला जातात? युद्धामुळे करिअर धोक्यात
1

Iran–US–Israel war: भारतीय विद्यार्थी ईराणमध्ये काय शिकायला जातात? युद्धामुळे करिअर धोक्यात

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य
2

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य

‘एनईपी’नुसार बदलणार अभ्यासक्रम! दुसऱ्या वर्गापासून पाठ्यपुस्तक बदलाची सुरुवात
3

‘एनईपी’नुसार बदलणार अभ्यासक्रम! दुसऱ्या वर्गापासून पाठ्यपुस्तक बदलाची सुरुवात

RTE साठी ९० हजारांवर अर्ज! राज्यातील ८६५१ शाळेतील १.१२ लाख जागांसाठी ऑनलाइन नोंदणी
4

RTE साठी ९० हजारांवर अर्ज! राज्यातील ८६५१ शाळेतील १.१२ लाख जागांसाठी ऑनलाइन नोंदणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.