
फोटो सौजन्य - Social Media
यंदाच्या TET परीक्षेत उमेदवारांचे ‘फेस रेकग्निशन’ अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रणाली आवश्यक करण्या मागचे हेतू म्हणजे, बनावट उमेदवारांना किंवा बोगस उमेदवारांना परीक्षा केंद्रावरून हद्दपार करणे अशी आहे. त्यासाठी ‘फोटो व्हा’ आणि ‘कनेक्ट व्यू’ प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या सर्व सुरक्षा व्यवस्थांना पाहता परीक्षा केंद्रावर शिस्तीचे अगदी काटेकोरपणे पालन होणार असल्याचे दिसून येत आहे.
मूळ उमेदवाराऐवजी इतर कुणी आत घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे स्मार्ट वॉच, स्मार्ट फोन तसेच कॅल्क्युलेटरसह इतर कोणतीही इलेकट्रोनिक उपकरणे नेण्यास बंदी आहे. उमेदवाराची अतिशय निरखून तपासणी केली जाईल. केलेल्या अर्जात आणि उमेदवारात थोडीही तफावत आढळ्यास उमेदवाराला एंट्री दिली जाणार नाही. जर तफावत असेल तर केंद्र संचालक त्या उमेदवाराची प्रत्यक्ष ओळख पाहणार तसेच त्या व्यक्तीचे ओळखपत्र आणि प्रवेशपत्र तपासूनच त्याला आत एंट्री दिली जाईल. एकंदरीत, अर्जातील माहिती आणि प्रत्यक्ष उमेदवार यांच्यात साधर्म्य असल्यासच प्रवेश देण्यात येणार आहे.
दरम्यान, शिक्षण मंडळाने एक महत्वाची सूचना जाहीर केली आहे. सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या TET परीक्षेबद्दल असणाऱ्या अधिकृत सूचना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर म्हणजेच https://mahatet.in/ वर प्रसिद्ध करण्यात येईल.