राज्यात टीईटी परीक्षा सक्तीबाबत निर्णय न घेतल्याने शिक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत परीक्षा सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा.