Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education News: खासगी क्लासवाल्यांना सरकारचा दणका! विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कडक नियमावली

महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने खासगी शिकवणी वर्गांसाठी नवीन कडक नियम जाहीर केले आहेत. आता यशाची हमी देण्यावर बंदी असून, आठवड्यात एक सुट्टी आणि दिवसाला फक्त ५ तास क्लास घेता येणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 12, 2026 | 08:30 PM
खासगी क्लासवाल्यांना सरकारचा दणका! विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कडक नियमावली (photo Credit- X)

खासगी क्लासवाल्यांना सरकारचा दणका! विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कडक नियमावली (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • खासगी क्लासवाल्यांना सरकारचा दणका!
  • विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कडक नियमावली
  • ‘यशस्वी होण्याची हमी’ देण्यावर बंदी
प्रा. सुनील देसाई । नवराष्ट्र: गडहिंग्लज, राज्यातील शाळांमध्ये तसेच खासगी शिकवणी वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण, तणाव निर्माण होऊ नये, तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्याचे आदेश देत शालेय शिक्षण विभागाने कडक पावले उचलली आहेत. खासगी शिकवणी वर्ग चालकांनी विद्यार्थी आणि पालकांना यशस्वी होण्याची हमी देऊ नये, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत खासगी शिकवणी वर्गासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन जिल्हास्तरीय निरीक्षण समितीत उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य असणार आहेत. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने सामाजिक कार्यकर्ता, बाल-मानस तज्ज्ञ नामनिर्देशित सदस्य असणार आहेत.

सुखदेव सहा यांनी सर्वोच्च न्यायालयात आंध्रप्रदेश सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी दि. २५ जुलै २०२५ दिलेल्या आदेशानुसार न्यायालयाने देशातील शाळांमध्ये तसेच खासगी शिकवणी वर्गातील विद्याथ्यांवरील ताण याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. खासगी शिकवणी वर्गाचे वेळापत्रक विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही, असे असावे. खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक यांच्यासाठी आठवड्‌यात किमान एक सुटी द्यावी. सुटीच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही मूल्यमापन चाचणी, परीक्षा घेऊ नये. शिकवणी वर्ग एका दिवसात पाच तासांपेक्षा अधिक नसावे. शिकवणी तास सकाळी फार लवकर किंवा सायंकाळी फार उशिरा ठेऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, क्षमतावृद्धीसाठी उपक्रम राबवावेत. प्रत्येक खासगी शिकवणी वर्गाने प्रभावी समुपदेशन व्यवस्था निर्माण करावी. आदी ताण कमी करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत.

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय

खासगी शिकवणी वर्गानी तक्रार निवारण यंत्रणा करावी

खासगी शिकवणी वगांनी महिन्यात तक्रार निवारण यंत्रणा तयार करावी, अधिकृत संकेतस्थळावर आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्रदर्शित करावी, तक्रार नोंदविण्याची पद्धत, जबाबदार अधिकारी, निवारणाची कार्यपद्धती निश्चित करावी, अशा सूचना देखील शालेय शिक्षण विभागाने केल्या आहेत.

समुपदेशक, यांची नियुक्तीची सूचना मानसशास्त्रज्ञ

या सूचनांच्या अनुषंगाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे शाळा आणि खासगी शिकवणी वर्गासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. १०० किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणान्या संस्थेत किमान एक पात्र समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ यांची नियुक्ती करावी. १०० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या ठिकाणी बाह्य मानसिक आरोग्य व्यावसायिकांची मदत घ्यावी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा अशा संस्थांमध्ये प्रवेशासाठी किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यशासाठी कोणतीही हमी देत नाही, याबाबत विद्यार्थी आणि पालकांना खासगी शिकवणी चालकांनी स्पष्टपणे अवगत करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला

Web Title: The government cracks down on private coaching classes strict regulations to reduce the stress on students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • education news
  • Student

संबंधित बातम्या

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय
1

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय

National Youth Day 2026: स्वामी विवेकाननंद जयंतीला का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन, वाचा उद्दिष्ट आणि इतिहास
2

National Youth Day 2026: स्वामी विवेकाननंद जयंतीला का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन, वाचा उद्दिष्ट आणि इतिहास

CA विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! ICAI चा मोठा निर्णय;आर्टिकलशीप आता होणार डिजिटल
3

CA विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! ICAI चा मोठा निर्णय;आर्टिकलशीप आता होणार डिजिटल

Kolhapur News : जिल्ह्यातील 72 विद्यार्थी इस्त्रोकडे रवाना; शिष्यवृत्तीत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश
4

Kolhapur News : जिल्ह्यातील 72 विद्यार्थी इस्त्रोकडे रवाना; शिष्यवृत्तीत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.