Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTE साठी ९० हजारांवर अर्ज! राज्यातील ८६५१ शाळेतील १.१२ लाख जागांसाठी ऑनलाइन नोंदणी

राज्यात Right to Education Act (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या ९ दिवसांत ९० हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले असून १.१२ लाख जागांसाठी स्पर्धा वाढली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 27, 2026 | 04:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यात Right to Education Act (आरटीई) अंतर्गत २५ टक्के प्रवेशप्रक्रियेला यंदा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत अवघ्या नऊ दिवसांत तब्बल ९० हजार ३७५ अर्ज दाखल झाले आहेत. १७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत राज्यातील ८ हजार ६५१ शाळांमधील १ लाख १२ हजार ७७२ जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्वयंअर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जाते.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षा केंद्रांबाबत अधिकृत खुलासा, परीक्षेसाठी ‘हे’ आहे नवे गणित

पालकांचा इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांकडे वाढता कल स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जागांपेक्षा अर्जांची संख्या जास्त असल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. विदर्भातील आकडेवारी पाहता एकूण २३ हजार ४३६ अर्ज दाखल झाले असून नागपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. अमरावती येथे २ हजार ४४२ जागांसाठी २ हजार ८२५ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर नागपूरमध्ये ६ हजार ९९४ जागांसाठी तब्बल ९ हजार ४२८ अर्ज दाखल झाले आहेत. अकोला (१८०१), बुलडाणा (१६७१), यवतमाळ (१६८७), चंद्रपूर (१६६८) या जिल्ह्यांतही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र गडचिरोलीत केवळ २८७ अर्ज आल्याने तुलनेने कमी प्रतिसाद दिसतो.

राज्याच्या इतर भागातही मिश्र चित्र दिसून येते. मुंबईत ५ हजार ९३९ जागांसाठी ३ हजार २०० अर्ज आले आहेत. ठाणे जिल्ह्यात ११ हजार ५९५ जागांसाठी ९ हजार ८४६ अर्ज दाखल झाले आहेत. संभाजीनगरमध्ये ४ हजार ८२३ जागांसाठी ४ हजार ८७९ अर्ज आले असून येथे अर्जांची संख्या किंचित जास्त आहे. कोल्हापूरमध्ये ३२९ जागांसाठी १ हजार २१२ अर्ज आले आहेत.

MCA CET: अर्जात दुरुस्तीची संधी! ‘या’ तारखांना घेण्यात येतील परीक्षा

दरम्यान, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. येथे १७ हजार ५०९ जागांसाठी १७ हजार ५५६ अर्ज दाखल झाले आहेत. जळगावमध्ये मात्र ३ हजार ३१० जागांसाठी २ हजार ८२ अर्ज प्राप्त झाले असून अर्जांचा वेग तुलनेने कमी आहे. १० मार्च ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असल्याने येत्या काही दिवसांत अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा अधिक तीव्र होणार असून पालकांनी वेळेत अर्ज सादर करणे गरजेचे ठरणार आहे.

Web Title: Rte online registration for 112 lakh seats in 8651 schools in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • education news
  • Right To Education Act

संबंधित बातम्या

Women Education: जिद्द जिंकली! सातारा जिल्हा परिषदेच्या ‘सेकंड चान्स’ उपक्रमामुळे ६९७ महिलांनी पार केली दहावीची पायरी
1

Women Education: जिद्द जिंकली! सातारा जिल्हा परिषदेच्या ‘सेकंड चान्स’ उपक्रमामुळे ६९७ महिलांनी पार केली दहावीची पायरी

FYJC 11th Admission: ११ वी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी आणि कट ऑफ कधी जाहीर होणार? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक!
2

FYJC 11th Admission: ११ वी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी आणि कट ऑफ कधी जाहीर होणार? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.