Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात! ₹७२ कोटी २२ लाखांची पारितोषिके दिली जाणार

राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून ₹७२ कोटी २२ लाखांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 07, 2025 | 09:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील शाळांच्या विकासासाठी आणि गुणवत्तावृद्धीसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या द्वितीय सत्रासोबतच या अभियानाची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील शाळांना एकूण ₹७२ कोटी २२ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. हे अभियान ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येईल, तर मूल्यांकन प्रक्रिया १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडेल.

रिक्षाचालकाच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात पास केली UPSC परीक्षा! जिद्द असावी तर अशी…

या अभियानात शाळांचे मूल्यांकन तीन मुख्य निकषांवर केले जाणार आहे. पायाभूत सुविधा (३८ गुण), शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी (१०१ गुण) आणि शैक्षणिक संपादन (६१ गुण). या तीनही घटकांवर एकूण २०० गुणांच्या आधारावर शाळांना गुणांकन दिले जाईल. यासाठी जिल्हा, तालुका आणि महापालिका स्तरावर स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका क्षेत्रात विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर! ‘या’ विषयांवर होणार परीक्षा

या उपक्रमात आकर्षक पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर प्रथम ₹११ लाख, द्वितीय ₹५ लाख, आणि तृतीय ₹३ लाख अशी बक्षिसे असतील. तालुकास्तरावर अनुक्रमे ₹३ लाख, ₹२ लाख आणि ₹१ लाख इतकी पारितोषिके दिली जातील. महापालिका स्तरावर प्रथम ₹२१ लाख, द्वितीय ₹१५ लाख आणि तृतीय ₹११ लाख, तर राज्यस्तरीय विजेत्या शाळांना सर्वाधिक म्हणजे प्रथम ₹५१ लाख, द्वितीय ₹३१ लाख आणि तृतीय ₹२१ लाख इतकी बक्षिसे देण्यात येणार आहेत. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम शाळांची भौतिक उभारणी, शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा एकूण विकास यांना चालना देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे शाळांना केवळ पारितोषिकेच नव्हे, तर शिक्षणात गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

Web Title: The third phase of the chief ministers my school beautiful school campaign begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 09:23 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
1

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
2

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.