Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Medical Exams: नीटपेक्षाही कठीण? डॉक्टर बनण्यासाठी जगभरात द्याव्या लागणाऱ्या ‘या’ सर्वात कठीण परीक्षा नक्की वाचा!

Global Medical Exams: भारतातील नीट (NEET UG) परीक्षेसह जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या ५ वैद्यकीय प्रवेश आणि परवाना परीक्षांची (USMLE, MCAT, PLAB) सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 31, 2026 | 04:13 PM
medical exam

medical exam

Follow Us
Follow Us:

Global Medical Exams: भारतात दरवर्षी जेव्हा ‘नीट’ (NEET) परीक्षा होते. तेव्हा परीक्षा केंद्राजवळील लाखो उमेद्वारांची गर्दी आणि पेपरचा ताण पाहूनच डॉक्टर बनणे किती आवघड आहे, याचा आंदाज येतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जागतिक स्तरावर वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षेच्या काठिण्य पातळीत फक्त नीट परीक्षेचा समावेश होतो की इतर देशांच्या परीक्षाही त्याहून कठीण आहेत. चला तर मग जाणून घेउया जगातील सर्वात कठिण वैद्यकीय परीक्षांविषयी, ज्या उत्तीर्ण झाल्यावर एखाद्याला डॉक्टरचा दर्जा मिळतो.

जगातील  सर्वात कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षा

नीट परीक्षा ही केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय परीक्षांच्या यादीत समाविष्ट आहे. नीटप्रमाणेच इतर देशातील वैद्यकीय प्रवेश परीक्षाही अत्यंत कठीण मानल्या जातात.

१. USMLE (युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसेंसिंग एक्झामिनेशन) – अमेरिका

अमेरिकेत डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. ही जगातली सर्वात कठीण मानली जाणारी परीक्षा आहे. तीन टप्प्यात होणारी ही परीक्षा पूर्ण करण्यासाठी उमेद्वारांना अनेक वर्ष खर्च करावी लागतात. या परीक्षेमध्ये केवळ सैद्धांतिक (थ्योरी) ज्ञानाच नाही तर प्रात्यक्षित (प्रॅक्टिकल) ज्ञान, क्लिनिकल कौशल्ये आणि दबावाखाली अचूक निर्णय घेण्याच्या क्षमतेची अत्यंत कडक तपासणी केली जाते.

२. MCAT (मेडिकल कॉलेज ॲडमिशन टेस्ट) – अमेरिका आणि कॅनडा

जर तुम्हाला अमेरिका किंवा कॅनडातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला ‘एमकॅट’ (MCAT) परिक्षेच्या मार्गाने जावे लागेल. ही एक कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे, जी ७.५ तासांपेक्षाही अधिक काळ चालते. या परीक्षेत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र आणि तार्किक क्षमता यांचे इतके फिरवून प्रश्न विचारले जातात की चांगल्या चांगल्या हुशार विद्यार्थ्यांना घाम सुटतो.

CBSE पोर्टलवर तांत्रिक बिघाड; पेमेंट सिस्टीममध्ये अचानक गडबड; डेटा लीकचा धोका किती खरा?पहा एका क्लिकवर..

३. नीट यूजी (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) – भारत

भारताची ‘नीट यूजी’ (NEET UG)परीक्षा कठीणतेच्या बाबतीत जगातील टॉप परीक्षेमध्ये सामील आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या परीक्षेची काठिण्यपातळी तर आहेच, पण त्याबरोबर परीक्षेला बसलेल्या विदयार्थ्यांची स्पर्धा मोठी होय. दरवर्षी २० ते २५ लाखांहून अधिक विद्यार्थी या सरकारी जागांसाठी बसतात. अवघ्या १ मार्कामुळे विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न तुटू शकते. ज्यामुळे ही परीक्षा मानसिक दृष्टीकोनातून जास्त दबावाची मानली जाते.

National Teachers Award:शिक्षण मंत्रालयाकडून ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ ची घोषणा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष

४. PLAB (प्रोफेशनल अँड लिंग्विस्टिक असेसमेंट बोर्ड) – ब्रिटन

ज्या डॉक्टरांना युनायटेड किंगडममध्ये जाऊन आपली सेवा द्यायची आहे. त्यांना प्लॅब परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. ही परीक्षा दोन भागात घेतली जाते, यामध्ये पहिला भाग हा लेखी तर दुसरा (PLAB 2) हा प्रात्यक्षिक आधारित म्हणजेच ‘ऑब्जेक्टिव्ह स्ट्रक्चर्ड क्लिनिकल एक्झाम’ (OSCE) असतो. यामध्ये विद्यार्थ्याना डमी रूग्ण आणि प्रत्यक्ष क्लिनिकल परिस्थिती समोर ठेऊन पारखले जाते, जिथे एक लहानशी चूकही अपयशास कारणीभूत ठरू शकते.

Web Title: Toughest medical exams globally neet ug usmle mcat plab comparison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Medical Education
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन
1

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन

रुग्णसुरक्षा आणि नियमपालनाला सर्वाधिक प्राधान्य! कॅडिला फार्मास्युटिकल्सची पुन्हा स्पष्ट भूमिका, जाणून घ्या सविस्तर
2

रुग्णसुरक्षा आणि नियमपालनाला सर्वाधिक प्राधान्य! कॅडिला फार्मास्युटिकल्सची पुन्हा स्पष्ट भूमिका, जाणून घ्या सविस्तर

Lowest MBBS Fees in India: खासगी कॉलेजेसचे कोट्यवधींचे बजेट विसरा! ‘NEET’ मध्ये टॉप रँक मिळवा आणि अवघ्या काही हजारांत डॉक्टर व्हा
3

Lowest MBBS Fees in India: खासगी कॉलेजेसचे कोट्यवधींचे बजेट विसरा! ‘NEET’ मध्ये टॉप रँक मिळवा आणि अवघ्या काही हजारांत डॉक्टर व्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.