Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

UCMAS National Competition 2026 : नवी मुंबईतील सिडको प्रदर्शनी केंद्रात २५ वी यूसीएमएएस राष्ट्रीय स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाली. ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत बौद्धिक चपळाई दाखवली.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 06, 2026 | 03:45 PM
National Competition

National Competition

Follow Us
Follow Us:

सिद्धेश प्रधान, मुंबई

UCMAS National Competition 2026 : २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपले गणितीय कौशल्य, एकाग्रता आणि मानसिक चपळाईचे प्रदर्शन २५व्या यूसीएमएएस राष्ट्रीय स्पर्धा २०२६ मध्ये केले. ५ आणि ६ सप्टेंबर रोजी वाशी, नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन व अधिवेशन केंद्रात या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या दोन दिवसीय स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून विद्यार्थी आल्याने नवी मुंबईत गणित स्पर्धेच्या निमित्ताने भारत एकवटल्याचे दृश्य वाशीत पाहायला मिळाले.

भारतातील मानसिक गणित आणि मुलांच्या बौद्धिक कौशल्यांच्या विकासासाठी समर्पित असलेल्या प्रमुख व्यासपीठांपैकी एक असलेल्या या स्पर्धेला १४ हजारहून अधिक पालक आणि अभ्यागतांनी उपस्थिती लावली. त्यामुळे यूसीएमएएसच्या या महत्त्वपूर्ण रौप्यमहोत्सवी स्पर्धेला देशभरातील युवा प्रतिभेचा उत्सव असे स्वरूप प्राप्त झाले.

या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे, उपसभापती सचिन अहिर, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडिया अर्थात एफआयआयचे अध्यक्ष भालचंद्रसिंग रावराणे, तसेच यूसीएमएएसच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्वाची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये प्रा. डॉ. डिनो वोंग, यूसीएमएएसचे संस्थापक आणि यूसीएमएएस आंतरराष्ट्रीय मुख्यालय, मलेशियाचे अध्यक्ष; अलेक्सन वोंग, जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी, यूसीएमएएस आंतरराष्ट्रीय मुख्यालय, मलेशिया; वोंग, महाव्यवस्थापक, यूसीएमएएस आंतरराष्ट्रीय मुख्यालय, मलेशिया; आणि डॉ. स्नेहल करिया, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, यूसीएमएएस इंडिया अँड नेपाळ तसेच यूसीएमएएस अमेरिका व कॅनडाच्या संयुक्त अध्यक्ष यांचा समावेश होता.

स्पर्धेत विद्यार्थ्यांना केवळ आठ मिनिटांत २०० अंकगणितीय प्रश्न सोडवण्याचे आव्हान देण्यात आले. अबॅकस-आधारित आणि मानसिक गणना तंत्रांचा वापर करत विद्यार्थ्यांनी केवळ वेग आणि अचूकताच नव्हे, तर एकाग्रता, स्मरणशक्ती, दृश्यात्मक कल्पनाशक्ती आणि दबावाखाली प्रभावीपणे काम करण्याची क्षमता देखील दाखवली. या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल बोलताना सिम्प्लिसिओ मेनेझेस, बिझनेस हेड, यूसीएमएएस इंडिया, म्हणाले, “देशभरातील ७ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणणे हे पारंपरिक शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे मुलांच्या क्षमतांच्या विकासावर पालकांचा वाढता भर दर्शवते.

मुलांनी दाखवलेला आत्मविश्वास, शिस्त आणि एकाग्रता निश्चितच उल्लेखनीय आहे. २५वी राष्ट्रीय स्पर्धा हे देशाच्या कानाकोपऱ्यातील युवा प्रतिभेचा उत्सव बनलेल्या या व्यासपीठाच्या उत्क्रांतीचे प्रतीक आहे.”

या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्दिष्ट

शिक्षणाच्या व्यापक उद्देशावर प्रकाश टाकताना डॉ. स्नेहल करिया, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, यूसीएमएएस इंडिया अँड नेपाळ तसेच यूसीएमएएस अमेरिका व कॅनडाच्या संयुक्त अध्यक्ष, म्हणाले, “आजच्या शिक्षणाने मुलांना केवळ योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी नव्हे, तर स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी, सखोल एकाग्रता साधण्यासाठी आणि आत्मविश्वासाने माहितीचे आकलन व प्रक्रिया करण्यासाठी तयार केले पाहिजे.

मानसिक गणित या मूलभूत क्षमतांना बळकटी देण्यास मदत करते. राष्ट्रीय स्पर्धेच्या २५व्या आवृत्तीचा टप्पा साजरा करत असताना, अधिक तीक्ष्ण विचार करणारी, आत्मविश्वासू आणि भविष्यासाठी सज्ज युवा मने घडवणे हेच आमचे उद्दिष्ट कायम आहे.”

How to get job in Google: गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न? ‘या’ ५ कठीण टप्प्यांमधून पार पडल्याशिवाय मिळणार नाही फायनल ऑफर!

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन केले

या स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच अनुभवी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांनीही सहभाग घेतला. देशातील विविध भागांमधून आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. पालक आणि शिक्षकांनाही सातत्यपूर्ण मानसिक गणिताच्या प्रशिक्षणामुळे मुलांमध्ये एकाग्रता, दृश्यात्मक कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि आत्मविश्वास यांसारख्या कौशल्यांचा विकास कसा होतो, हे पाहण्याची संधी मिळाली.

स्पर्धेची सांगता भव्य पुरस्कार सोहळ्याने झाली. विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय वेग, अचूकता आणि मानसिक गणितातील क्षमतेसाठी गौरवण्यात आले.

Pune Album Song: ‘पुण्याचा गणपती आहे सोन्याचा’! सात वर्षीय प्रणाली सुकाळेच्या गोड आवाजातील भक्तिगीत वेधले लक्ष

२५व्या आवृत्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या यूसीएमएएस राष्ट्रीय स्पर्धेने भारतातील उदयोन्मुख गणितीय प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून आपले स्थान अधिक दृढ केले. तसेच, वर्गखोल्येच्या पलीकडे उपयोगी ठरणाऱ्या विविध कौशल्यांच्या विकासासाठी मुलांना प्रोत्साहन देण्याच्या यूसीएमएएसच्या उद्देशाला अधोरेखित केले.

Web Title: Ucmas national competition 2026 navi mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • education
  • National Sports Competition

संबंधित बातम्या

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
1

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Purnima vs Teachers Day Difference:  गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
2

Purnima vs Teachers Day Difference: गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश
3

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर
4

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.