Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC-NET 2026 : चुकीच्या प्रश्नांमुळे UGC-NET चे ३ पेपर झाले रद्द; जाणून घ्या फेरपरीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक!

UGC-NET 2026 Re-Exam: NTA ने UGC-NET जून २०२६ मधील इंग्रजी, कॉमर्स आणि सोशियोलॉजी विषयांची फेरपरीक्षा ९ आणि १० सप्टेंबर २०२६ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 17, 2026 | 01:15 PM
RE EXAM NET

RE EXAM NET

Follow Us
Follow Us:

UGC-NET 2026 Re-Exam: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जूनमध्ये घेतलेल्या UGC-NET परीक्षेच्या तीन विषयांचे पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पेपरच्या प्रश्नपत्रिकामध्ये अनेक गंभीर उणिवा आणि गडबडी आढळून आल्या होत्या, त्यानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्या विषयांची पुनर्रिक्षा होणार आहे, त्यांची नावे इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र अशी आहेत. NTA ने ‘एक्स’ वर पोस्ट लिहून याबाबतची घोषणा केली आहे.

NTA नुसार, इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या विषयांच्या पेपरशी संबंधित अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने आपल्या तपासात तथ्ये, टायपिंग आणि भाषांतराशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी शोधून काढल्या. तपासात असे दिसून आले की अनेक प्रमुख विद्वानांच्या नावांचे स्पेलिंग चुकीचे होते. पुस्तकांच्या शीर्षकांमध्ये गडबड होती. प्रश्नांच्या मुख्य भागातही उणिवा आढळल्या.

समितीने आपल्या पडताळणीत व्याकरणाच्या चुका, लिंग आणि वचनाशी संबंधित उणिवा, विरामचिन्हांच्या गडबडी आणि प्रस्थापित संकल्पनांसाठी नॉन स्टॅन्डर्ड शब्दांच्या वापराचा शोध लावला. जुन्या परीक्षांमध्ये विचारलेले अनेक प्रश्न या वेळी पुन्हा रिपीट करण्यात आले होते, असेही तपासात समोर आले. त्यानंतर समितीने या तिन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याची शिफारस केली. ती मान्य करून एनटीएने पुन्हा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

UGC-NET 2026 फेरपरीक्षेचे वेळापत्रक

NTA च्या नवीन परीक्षा कार्यक्रमा अनुसार, UGC-NET 2026 ची पुनर्रिक्षा ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत इंग्रजी विषयाची परीक्षा होईल. त्याच दिवशी दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत दुसऱ्या शिफ्टमध्ये कॉमर्स विषयाची परीक्षा आयोजित केली जाईल. पुढील दिवशी म्हणजेच १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत समाजशास्त्र या विषयाची परीक्षा घेतली जाईल.

NIOT Recruitment 2026: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये भरती सुरू; कोण करू शकतं अर्ज आणि काय आहेत अटी?

NTA ने स्पष्ट केले की, UGC-NET 2026 च्या पुनर्रिक्षेसाठी कोणतेही नवीन शुल्क द्यावे लागणार नाही. या परीक्षेसाठी शहर, परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्राशी संबंधित माहिती NTA च्या अधिकृत वेबसाइटवर स्वतंत्रपणे जारी केली जाईल. एजन्सीने म्हटले की, ८४ विषयांचे निकाल ठरलेल्या वेळापत्रकानुसारच जाहीर केले जातील आणि त्यावर ३ विषयांच्या फेरपरीक्षेचा कोणताही परिणाम होणार नाही.

कधी घेण्यात आली होती UGC-NET ची परीक्षा?

एजन्सीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, या ८४ विषयांच्या उमेदवारांसाठी JRF जागांचे वाटप, सहाय्यक प्राध्यापक पात्रता आणि पीएचडी प्रवेशासाठी ई-सर्टिफिकेट जारी करण्यात कोणतीही उशीर होणार नाही. NTA ने सल्ला दिला की सर्व उमेदवारांनी फेरपरीक्षा, परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्राशी संबंधित माहितीसाठी NTA ची अधिकृत वेबसाइट नियमितपणे चेक करत राहावी.

UPSC NDA Exam 2026: परीक्षा जवळ आलीय, आता शेवटच्या काही दिवसांत तयारी कशी करावी? जाणून घ्या

यापूर्वी NTA ने २२ ते ३० जून २०२६ दरम्यान ८७ विषयांसाठी UGC-NET जून २०२६ परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा ज्युनियर रिसर्च फेलोशिप, सहाय्यक प्राध्यापक पात्रता आणि पीएचडी कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. आता यापैकी ८४ विषयांचे निकाल जाहीर केले जातील, तर ३ विषयांचे निकाल नंतर घोषित केले जातील.

Web Title: Ugc net 2026 re examination schedule english commerce sociology news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • education
  • UGC net

संबंधित बातम्या

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!
1

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!

Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!
2

Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश
3

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’
4

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.