Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Kharagpur Medical Course: मोठी बातमी! इंजिनिअरिंगनंतर आता मेडिकलचेही शिक्षण ‘या’ संस्थानात मिळणार

IIT Kharagpur Medical Course: नॅशनल मेडिकल कौन्सिलने (NMC) IIT खड़गपुरला पोस्ट ग्रॅजुएट डॉक्टर ऑफ मेडिसिन (MD) कोर्सेस सुरू करण्याची मंजुरी दिली आहे. असा मान मिळवणारे IIT खड़गपुर हे देशातील पहिले IIT ठरले असून, येथे २०२७ च्या सत्रापासून NEET परीक्षेद्वारे प्रवेश दिले जातील.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 17, 2026 | 10:45 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • इंजिनिअरिंगनंतर आता मेडिकलचेही शिक्षण सुरू होणार
  • मेडिकल कोर्स सुरू करणारे देशातील पहिले IIT
  • ऑक्टोबरमध्ये NMC टीमने केली होती पाहणी
IIT Kharagpur Medical Course: IIT खड़गपुर हे देशातील पहिले असे IIT ठरले आहे, जिथे पोस्ट ग्रॅजुएट मेडिकल कोर्सेस सुरू केले जाणार आहेत. नॅशनल मेडिकल कौन्सिलने IIT खड़गपुरला मेडिकल कोर्सेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. IIT खड़गपुरने मार्च महिन्यात नॅशनल मेडिकल कौन्सिलकडे पोस्ट ग्रॅजुएट डॉक्टर ऑफ मेडिसिन (MD) कोर्स सुरू करण्यासाठी अर्ज केला होता.

मेडिकल कोर्स सुरू करणारे देशातील पहिले IIT

सध्या IIT खड़गपुरशिवाय देशातील इतर कोणत्याही IIT मध्ये मेडिकल कोर्सेस सुरू करण्याची परवानगी नॅशनल मेडिकल कौन्सिलकडून मिळालेली नाही. इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर सुमन चक्रवर्ती यांनी ३१ मार्च २०२६ रोजी याबाबत NMC मध्ये अर्ज दाखल केला होता. आपल्या या अर्जात IIT खड़गपुरने पोस्ट ग्रॅजुएट डॉक्टर ऑफ मेडिसिनच्या २० जागांची मागणी केली होती.

IIT खड़गपुरमध्ये मेडिकल कोर्स सुरू करण्याच्या या अर्जाला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजेच शिक्षण मंत्रालयाचाही पाठिंबा मिळाला होता. या अर्जावर अंतिम निर्णय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर आणि नॅशनल मेडिकल कौन्सिलला घ्यायचा होता.

CTET exam 2026: सरकारी शिक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ स्मार्ट नियोजनाने करा परीक्षा उत्तीर्ण

ऑक्टोबरमध्ये NMC टीमने केली होती पाहणी

गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२६ मध्ये नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या टीमने IIT खड़गपुर कॅम्पसमध्ये असलेल्या डॉ. बी. सी. रॉय मेडिकल कॉलेजचा आढावा घेतला होता. त्यानंतर NMC कडून हा कोर्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ऑक्टोबरमध्ये NMC च्या टीमने IIT खड़गपुरच्या बलरामपुर कॅम्पसमध्ये असलेल्या श्यामा प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चलाही भेट दिली होती. अहवालानुसार, डॉक्टर ऑफ मेडिसिनचे विद्यार्थी येथे हँड्स-ऑन ट्रेनिंग घेतील. IIT खड़गपुरमध्ये केवळ NEET परीक्षेच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. यासाठी इन्स्टिट्यूकडून २० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे २०२७ च्या सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतील.

JEE Main 2027: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटमध्ये….’ ? NTA चा मोठा निर्णय

IIT खड़गपुरने जनरल मेडिसिन व्यतिरिक्त रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी आणि कम्युनिटी मेडिसिनच्या शिक्षणासाठी NMC कडे अर्ज केला होता. पश्चिम बंगालमधील IIT खड़गपुर कॅम्पसमध्ये असलेल्या डॉ. व्ही. सी. रॉय मल्टी-स्पेशालिटी मेडिकल रिसर्च सेंटरची पायाभरणी तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते १७ मे २००७ रोजी करण्यात आली होती. यामध्ये एमबीबीएस कॉलेजसोबतच सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलचीही पायाभरणी करण्यात आली होती.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोस्ट ग्रॅजुएट मेडिकल कोर्सेस सुरू करणारे देशातील पहिले IIT कोणते ठरले आहे?

    Ans: नॅशनल मेडिकल कौन्सिलने (NMC) मंजुरी दिल्यानंतर IIT खड़गपुर हे पोस्ट ग्रॅजुएट मेडिकल कोर्सेस (MD) सुरू करणारे देशातील पहिले IIT ठरले आहे.

  • Que: IIT खड़गपुरमधील मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश कसा मिळेल आणि किती जागा आहेत?

    Ans: IIT खड़गपुरमध्ये केवळ NEET परीक्षेच्या माध्यमातूनच प्रवेश दिला जाईल. इन्स्टिट्यूटने पोस्ट ग्रॅजुएट डॉक्टर ऑफ मेडिसिनच्या (MD) २० जागांसाठी अर्ज केला होता आणि २०२७ च्या सत्रापासून हे कोर्सेस सुरू होतील.

  • Que: IIT खड़गपुरमध्ये कोणकोणत्या मेडिकल विषयांचे शिक्षण दिले जाणार आहे?

    Ans: IIT खड़गपुरने जनरल मेडिसिन व्यतिरिक्त रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी आणि कम्युनिटी मेडिसिन या विषयांच्या शिक्षणासाठी NMC कडे अर्ज केला होता.

Web Title: Iit kharagpur first iit to start postgraduate medical courses nmc approval sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • education
  • IIT
  • Medical Education

संबंधित बातम्या

JEE Main 2027: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटमध्ये….’ ? NTA चा मोठा निर्णय
1

JEE Main 2027: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘आधार कार्ड आणि १० वीच्या मार्कशीटमध्ये….’ ? NTA चा मोठा निर्णय

NIFTEE 2027 Registration Extended: निफ्ट प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म!
2

NIFTEE 2027 Registration Extended: निफ्ट प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फॉर्म!

Satellite Engineer Career Scope: इस्रोच्या मोहिमांनंतर स्पेस सेक्टरमध्ये मोठी संधी! सॅटेलाइट इंजिनिअर कसे बनवायचे? जाणून घ्या
3

Satellite Engineer Career Scope: इस्रोच्या मोहिमांनंतर स्पेस सेक्टरमध्ये मोठी संधी! सॅटेलाइट इंजिनिअर कसे बनवायचे? जाणून घ्या

एका GPU च्या शोधाने रचला इतिहास! जगातील सर्वात मोठया टेक कंपनीचे CEO Jensen Huang नेमकं किती शिकलेत?
4

एका GPU च्या शोधाने रचला इतिहास! जगातील सर्वात मोठया टेक कंपनीचे CEO Jensen Huang नेमकं किती शिकलेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.