Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UK student visa : युकेत शिक्षण घेणं होणार महाग! विद्यार्थ्यांना दाखवावा लागणार वाढीव मेंटेनेंस फंड

UK student visa maintenance fund 2026 : युके स्टुडंट व्हिसासाठी मेंटेनेंस फंड वाढवला आहे. ३० नोव्हेंबर २०२६ पासून नवीन नियम लागू होणार असून लंडन आणि लंडनबाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना किती फंड दाखवावा लागेल? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 06, 2026 | 05:25 PM
student visa

student visa

Follow Us
Follow Us:

UK student visa maintenance fund 2026 : युकेत जाऊन शिक्षण घेण्याची तयारी करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ३० नोव्हेंबर २०२६ पासून युकेच्या स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा अधिक रकमेचा निधी (फंड) दाखवावा लागणार आहे. युके होम ऑफिसने ३ सप्टेंबर २०२६ रोजी इमिग्रेशन नियमांमध्ये बदल केले असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मेंटेनेंस फंड वाढवण्यात आला आहे.

या बदलाचा परिणाम युकेमध्ये शिक्षणासाठी स्टुडंट व्हिसा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होईल. ही रक्कम विद्यार्थ्यांना युके सरकारकडे जमा करावी लागत नाही, तर अभ्यासादरम्यान राहण्याचा व दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध आहे, हे त्यांना सिद्ध करावे लागते. हा खर्च ट्यूशन फीपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल.

लंडनमध्ये अभ्यासासाठी किती रक्कम दाखवावी लागेल?

नवीन नियम लागू झाल्यानंतर लंडनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १,५७० ब्रिटिश पाउंड (अंदाजे २.०१ लाख रुपये) मेंटेनेंस फंड दाखवावा लागेल. सध्या ही रक्कम १,५२९ ब्रिटिश पाउंड (अंदाजे १.९५ लाख रुपये) आहे. विद्यार्थ्यांना कमाल ९ महिन्यांच्या राहण्याचा खर्च दाखवावा लागतो. त्यानुसार लंडनसाठी कमाल रक्कम १४,१३० ब्रिटिश पाउंड होईल, जी भारतीय चलनात सुमारे १८.०६ लाख रुपयांच्या घरात जाईल. सध्या ९ महिन्यांसाठी ही रक्कम १३,७६१ ब्रिटिश पाउंड आहे.

लंडनबाहेर अभ्यास करणाऱ्यांसाठीही वाढली रक्कम

युकेमध्ये लंडनच्या बाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही मेंटेनेंस रिक्वायरमेंट वाढवण्यात आली आहे. सध्या दरमहा १,१७१ ब्रिटिश पाउंड रक्कम दाखवावी लागते, जी ३० नोव्हेंबरपासून वाढून १,२०३ ब्रिटिश पाउंड होईल. ९ महिन्यांनुसार कमाल रक्कम १०,८२७ ब्रिटिश पाउंड असेल. सध्याच्या नियमांत ही रक्कम १०,५३९ ब्रिटिश पाउंड आहे. म्हणजेच ९ महिन्यांसाठी २८८ ब्रिटिश पाउंडची वाढ झाली आहे.

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

ट्यूशन फीपेक्षा वेगळा असेल हा फंड

स्टुडंट व्हिसा अंतर्गत मेंटेनेंस फंडचा उद्देश युकेमध्ये राहताना विद्यार्थी स्वतःचा खर्च उचलू शकतो हे दाखवणे हा आहे. ही रक्कम ट्यूशन फी, व्हिसा फी आणि इमिग्रेशन हेल्थ सरचार्जपेक्षा वेगळी असेल. विद्यार्थ्यांना सहसा त्यांच्या अभ्यासक्रमाच्या कालावधीनुसार राहण्याचा खर्च दाखवावा लागतो, मात्र याची कमाल मर्यादा ९ महिने आहे. अभ्यासक्रम ९ महिन्यांपेक्षा कमी असल्यास, संबंधित कालावधीसाठीच रक्कम दाखवावी लागेल.

३० नोव्हेंबरची तारीख महत्त्वाची

नवीन आणि जुन्या नियमांमधला तारखेचा फरक महत्त्वाचा आहे. ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी दाखल केलेले अर्ज २९ नोव्हेंबर रोजी लागू असलेल्या इमिग्रेशन नियमांनुसार तपासले जातील. तर ३० नोव्हेंबर किंवा त्यानंतर केलेल्या अर्जांवर नवीन मेंटेनेंस रिक्वायरमेंट लागू होईल. युके होम ऑफिसच्या मते, ही वाढ २०२६-२७ साठी युकेच्या देशांतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या मेंटेनेंस लोनच्या पातळीनुसार करण्यात आली आहे. होम ऑफिसने स्पष्ट केले आहे की, स्टुडंट रूटचा गैरवापर रोखण्याच्या उपायांचाच हा एक भाग आहे.

KMPML Recruitment 2026 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी! KMPMLअंतर्गत करार पद्धतीने होणार ‘या’ पदांची भरती

Web Title: Uk student visa maintenance fund increased 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • London
  • Visa Rule

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.