
Image
ताजा आकडेवारीनुसार, या वर्षी आयर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी एकूण ५,१०० भारतीय विद्यार्थ्यांनी स्टुडंट व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. परंतु, जेव्हा आयरिश दूतावास आणि तेथील व्हिसा अधिकाऱ्यांनी या अर्जांची बारकाईने तपासणी केली, तेव्हा एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर आले. एकूण अर्जांपैकी सुमारे ३,३०० विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज पूर्णपणे फेटाळण्यात आले. याचा थेट अर्थ असा की, अर्ज करणाऱ्या सुमारे ६४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा एआय-लिखित मजकुरामुळे त्वरित रद्द करण्यात आला.
MBBS Doctor ऑपरेशन करू शकतात की फक्त प्राथमिक उपचार? जाणून घ्या कामाबद्दल आणि पगाराबद्दल!
वास्तविक, आजकाल व्हिसा प्रोसेसिंग सिस्टीम अत्यंत आधुनिक आणि प्रगत करण्यात आली आहे. परदेशी दूतावासांकडे असे विशेष ‘एआय डिटेक्टर’ सॉफ्टवेअर्स आणि टूल्स उपलब्ध आहेत, जे एखादा मजकूर माणसाने स्वतःच्या विचाराने लिहिला आहे की तो संगणकावरून ऑटो-जनरेट केला आहे, हे सहज पकडू शकतात. जेव्हा हजारो विद्यार्थ्यांच्या फाईल्समध्ये एकसारखी भाषा, कृत्रिम शब्द आणि एकाच पद्धतीचा रायटिंग पॅटर्न दिसून आला, तेव्हा व्हिसा अधिकाऱ्यांना त्वरित संशय आला. एआय द्वारे लिहिलेल्या अर्जामध्ये विद्यार्थ्यांच्या वास्तविक भावना, मौलिकता आणि सत्यता गायब होती, असे दूतावासाचे मानणे आहे.
कोणत्याही देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी सादर केलेले ‘स्टेटमेंट ऑफ पर्पस’ (SOP) हा अर्जातील सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असतो. याद्वारे परदेशी सरकारला हे समजून घ्यायचे असते की, विद्यार्थ्याला नेमके त्याच देशात का यायचे आहे, त्याची आर्थिक स्थिती कशी आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचे काय बेत आहेत. व्हिसा नियमांनुसार हे पत्र विद्यार्थ्याने स्वतःच्या भाषेत लिहिणे पूर्णपणे बंधनकारक आहे. परंतु, भारतीय विद्यार्थ्यांनी शॉर्टकट अवलंबत स्वतः मेहनत करण्याऐवजी एआय कडून संपूर्ण अर्ज तयार करून घेतला. दूतावासाने याकडे एक गंभीर फसवणूक आणि औपचारिकतेचा अभाव म्हणून पाहिले आणि कडक भूमिका घेत व्हिसा फेटाळून लावला.
Ans: विद्यार्थ्यांनी स्वतःचा 'स्टेटमेंट ऑफ पर्पस' (SOP) आणि व्हिसा अर्ज स्वतः न लिहिता ChatGPT सारख्या AI टूल्सचा वापर करून कॉपी-पेस्ट केला होता, त्यामुळे अर्जातील मौलिकता आणि सत्यता नसल्याने व्हिसा रद्द करण्यात आला.
Ans: परदेशी दूतावासांकडे प्रगत 'AI डिटेक्टर' सॉफ्टवेअर्स असतात. शिवाय हजारो अर्जांमध्ये एकसारखी भाषा, कृत्रिम शब्द आणि एकच रायटिंग पॅटर्न दिसून आल्याने अधिकाऱ्यांनी हे अर्ज फेटाळले.