sleep
पुण्याची पूजा माधव वव्हालने केवळ झोपून ९ लाख रुपये कमावले आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला असेल. पण हे खरं आहे. तिने केवळ झोपून ९ लाख रुपये कमावले आहे. पूजा दिवसा यूपीएससी परीक्षाच अव्हास करत होती. आणि रात्री मस्त ९ घंटे झोपून आपली इंटर्नशिप पूर्ण करत होती. पूजा माधवचा काम केवळ झोपणं होत.
भविष्य सांगून उभा केला कोटींचा साम्राज्य! InstaAstro ची यशोगाथा
तिने एका स्पर्धेत भाग घेतला होता, ते स्पर्धा जिंकून ‘स्लीप चैंपियन ऑफ द ईयर’ बनली आहे. मीडिया रिपोर्टनुसार तिला या पदवीसह ९ लाखाहून अधिक रोख बक्षीस देखील मिळाले आहे.
‘स्लीप क्वॉलिटी’च्या आधारे जिंकली
स्लिप चॅम्पियन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना कॉन्टॅक्टलेस स्लीप ट्रॅकर्स आणि वेकफिट गाद्या देण्यात आल्या. याने त्यांची स्लिप क्वालिटीचे निरीक्षण करण्यात येत होते. यासोबतच, त्यांना झोपण्याच्या सवयी सुधारण्यासाठी अनेक आव्हाने देखील देण्यात आली. अंतिम फेरीत. उमेदवारांनी बेड डोळ्यांवर पट्टी बांधणे, अलार्म घड्याळ शोधणे इत्यादी मजेदार कामे केली. त्यानंतर अंतिम ‘स्लीप-ऑफ’ मध्ये, त्यांच्या झोपेची सातत्य आणि शिस्त यांचे मूल्यांकन करण्यात आले. पूजा माधवने 91.36 गुण मिळवून सर्वोच्च पारितोषिक जिंकले.
स्लीप इंटर्नशिपची पहिली आवृत्ती २०१९ मध्ये आयोजित करण्यात आली होती. याचे ४ सीजन पूर्ण केले आहेत. दरवर्षी लाखो लोक या इंटर्नशिपसाठी अर्ज करतात. यामधील , उमेदवारांना स्लीप इंटर्न म्हणतात. त्यांना सलग ६० दिवस दररोज रात्री किमान ९ तास झोपण्याचे काम दिले जाते. कॉन्टॅक्टलेस ट्रॅकर वापरून झोपेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणे आणि घरून फीडबॅक रूटीन पूर्ण करणे हे उद्दिष्ट आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांचे मूल्यांकन ऑनलाइन फॉर्म, व्हिडिओ रिज्युम आणि मुलाखतींद्वारे केले जाते.
घरी झोपून लाखोंची कमाई
या स्पर्धेतील विजेत्या, म्हणजेच स्लीप चॅम्पियन पूजा माधव वाव्हल हिला ९ लाख रुपये आणि इतर उमेदवारांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात आले. ही इंटर्नशिप पूर्णपणे घरातून काम करणारी आणि रिमोट पद्धतीने (वर्क फ्रॉम होम जॉब्स) आहे. २०२५ च्या ‘ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड’ नुसार, ५८% भारतीय रात्री ११ नंतर झोपतात आणि सुमारे अर्धे लोक सकाळी उठल्यावर थकल्यासारखे वाटतात. ही इंटर्नशिप या समस्येवर मात करण्याचा एक अनोखा आणि आकर्षक मार्ग सिद्ध होत आहे.
परदेशात मिळाली नोकरी पण देशसेवेचा वेड शांत बसू देईना! मायदेशी परतून क्रॅक केली UPSC