
best college
US News Best College Rankings 2027 : परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या आणि अमेरिकेतील उच्च शिक्षणाबद्दल माहिती घेण्यास उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ‘यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट’ने आपली ‘बेस्ट कॉलेज रँकिंग २०२७’ प्रसिद्ध केली आहे. यावेळच्या रँकिंगमध्ये एक ऐतिहासिक बदल पाहायला मिळाला आहे. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (MIT) सलग १५ वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
सुमारे १,७०० उच्च शिक्षण संस्थांच्या सखोल मूल्यांकनानंतर जाहीर झालेली अमेरिकेतील सर्वोत्तम १० युनिव्हर्सिटीजची यादी खालीलप्रमाणे आहे:
आयव्ही लीग हा अमेरिकेतील ८ अत्यंत प्रतिष्ठित खाजगी संशोधन युनिव्हर्सिटीजचा एक समूह आहे. २०२७ च्या या रँकिंगमध्ये आठही आयव्ही लीग कॉलेजेस — हॉर्वर्ड, प्रिन्स्टन, येल, पेनसिल्व्हेनिया, ब्राऊन, कोलंबिया, कॉर्नेल आणि डार्टमाउथ — यांनी आपले मजबूत स्थान कायम ठेवले आहे. यापैकी प्रिन्स्टन, हॉर्वर्ड, येल आणि पेनसिल्व्हेनिया या चार संस्थांनी टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे.
IIM मध्ये मोठा बदल! UG कोर्सेससाठी होणार एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’; RTI मधून मोठा खुलासा
अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी योग्य कॉलेज निवडण्यात ही रँकिंग अत्यंत मदत करते. या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना SAT/ACT स्कोअरसोबतच एक मजबूत प्रोफाईल (Profile) असणे आवश्यक असते. ही रँकिंग शैक्षणिक कामगिरी, संशोधन, प्राध्यापक संसाधने आणि करिअरच्या संधी यांसारख्या कडक निकषांच्या आधारे तयार केली जाते. जर तुम्हीही अमेरिकन कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची योजना आखत असाल, तर या टॉप संस्थांच्या अधिकृत ॲडमिशन पोर्टलला भेट देऊन अंतिम मुदत आणि अर्ज प्रक्रियेची माहिती मिळवू शकता.