या मार्गावर रविवारी विशेष पॉवर ब्लॉक, अनेक लोकल गाड्या होणार रद्द! प्रवाशांचे हाल
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रुप D च्या विविध पदांसाठी या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही रेल्वेत भरती होऊ पाहत आहात तर नक्कीच या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यात यावा. मुळात, या भरतीच्या माध्यमातून भारतीय रेल्वेतील ३२,००० रिक्त जागांना भरण्यात येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. तसेच संपूर्ण भारतभरात या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
मुळात, या भरतीची अधिसूचना 28th डिसेंबर २०२४ रोजी, जाहीर करण्यात आली होती. २३ जानेवारी २०२५ पासून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या दिवसापासून अर्ज करण्याची विंडो इच्छुक उमेदवारांसाठी खुली करण्यात येणार आहे. तसेच, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. उमेदवारांना २२ फेब्रुवारी २०२५ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अगोदर काही पात्रता निकषांना लक्षात घेणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात या पात्रता निकषांबद्दल:
RRB च्या या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसचे काही उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. या भरतीमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे, पदांनुसार अटी शर्ती पुरवण्यात आल्या आहेत. तरी साधारणता या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार SSC उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे, तसेच संबंधित क्षेत्रामध्ये उमेदवाराने ITI पूर्ण केले असावे. अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या वयोमर्यादे संदर्भात अटीनुसार, किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३६ वर्षे आयु असणारे उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. शासकीय नियमानुसार, आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. यामध्ये सामान्य तसेच OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच यातील ४०० रुपये पुढे रिफंड करण्यात येतील. तर अर्ज शुल्काची रक्कम SC आणि ST प्रवर्गासाठी २५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच पुढे या घटकांना संपूर्ण अर्ज शुल्क रिफंड करण्यात येईल.
पुढील ४ टप्प्यांमध्ये होणार नियुक्तीची प्रक्रिया: