फोटो सौजन्य - Social Media
डायरेक्टोरेट जनरल ऑफ आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसने ग्रुप C सिव्हिलिअन पोस्टसाठी भरतीचे आयोजन केले आहे. एकूण ११३ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजली गेली आहे. मुळात, ही भरती अद्याप सुरु करण्यात आली नाही आहे. परंतु, या संदर्भात अधिकृत अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, ७ जानेवारी २०२५ पासून या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच अर्ज करण्याची विंडो ६ फेब्रुवारी २०२५ या तारखेपर्यंत खुली राहणार आहे. या दरम्यान, इच्छुक आणि पात्रता निकषांना पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात, या भरती विषयक महत्वाच्या बाबी:
मुळात, या भरतीच्या माध्यमातून एकूण ११३ रिक्त जागांना भरण्यात येणार आहे. या जागा विविध पदांच्या संबंधित आहेत. अकाउंटंट्स, स्टेनोग्राफर, क्लार्क, स्टोअर किपर, फोटोग्राफर, फायरमन, कूक आणि अनेक पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतभरामध्ये या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. स्त्री तसेच पुरुष दोघांसाठी ही भरती आयोजली गेली आहे. दोघेही इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज कारण्यासाठीच उमेदवारांनी dgafms.onlineregistrationform.org या अधिकृत संकेतस्थळाचा आढावा घेण्यात यावा. तसेच उमेदवारांना नियुक्तीस पात्र होण्यासाठी फेब्रुवारी २०२५ किंवा मार्च २०२५ मध्ये आयोजित परीक्षेला पात्र व्हावे लागणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही पात्रता निकषांचा अभ्यास करावा लागणार आहे. हे पात्रता निकष प्रत्येक पदासाठी वेगवेगळे आहेत. वयोमायदे संबंधित अटीनुसार, आरक्षित परवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराला वयोमर्यादेत ३ वर्षे अधिकची सूट देण्यात आली आहे. तसेच SC आणि ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराला अधिक ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर PwBD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारालाअधिक १० वर्षांची सूट देण्यात आली आहे. शैक्षणिक तसेच वयोमर्यादे संबंधित निकष जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
DGAFMS Group ‘C’ Recruitment 2025 मध्ये नियुक्तीसाठी काही टप्पे आयोजित करण्यात येतील. यामध्ये उमेदवारांना काही परीक्षांसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. यामध्ये लेखी परीक्षेचा समावेश आहे. या परीक्षेत सामान्य ज्ञान, सामान्य इंग्रजी तसेच बुद्धिमत्तेसंबंधित प्रश्न विचारले जातील. या परीक्षेला पात्र करावे लागणार आहे. तसेच काही पदांसाठी उमेदवारांना वैद्यकीय चाचणी आणि टायपिंग चाचणीसारख्या परीक्षेला उपस्थित राहावे लागणार आहे.