फोटो सौजन्य - Social Media
२०२५ हे वर्ष नक्कीच अनेक जणांसाठी महत्वाचे ठरणार आहे. कामाच्या तसेच नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी हे वर्ष काही खास आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी भरतीला सुरुवात केले आहे. तसेच या भरती संदर्भात काही अर्जाची विंडो या वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसात खुली करण्यात आले आहे. तसेच काही भरतीच्या प्रक्रिया या दिवसात समाप्तीला येत आहेत. जर तुम्ही सरकारी क्षेत्रातील भरतीच्या प्रक्रियेविषयी वाट पाहत असाल. तर हा लेख जरूर वाचा. चला तर मग जाणून घेऊयात भरतीच्या प्रक्रियेविषयी.
RRB Railway Group D Vacancy: रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांसाठी भरती
रेल्वे भरती बोर्डाने ग्रुप डीच्या 32 हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार आहे. रेल्वेच्या ग्रुप डी भरतीसाठी उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असावा किंवा एनसीव्हीटीकडून राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (एनएसी) प्राप्त केलेले असावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
DSSSB PGT Recruitment 2025: पीजीटी शिक्षकांच्या ४३२ रिक्त पदांसाठी भरती
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने विविध विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षकांच्या 400 हून अधिक पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे . तर सदर पदांसाठी इच्छुक उमेदवारांना16 फेब्रुवारीपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
BOB SO Recruitment Last Date : बँक ऑफ बडोदा एसओ भरतीची अंतिम तारीख
बँक ऑफ बडोदाने तज्ञ अधिकारीच्या 1,267 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2025 आहे. ही भरती पदवीधर उमेदवारांसाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन या भरतीसाठी अर्ज करावा.
SBI Clerk Recruitment Last Date: एसबीआय क्लर्क भरतीची अंतिम तारीख
एसबीआयने कनिष्ठ सहयोगीच्या सुमारे 14 हजार पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. तुम्ही जर पदवीधर असाल आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर या भरतीसाठी अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी 7 जानेवारीपूर्वी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करावा.
SBI PO Recruitment Last Date: एसबीआय पीओ भरतीची अंतिम तारीख
भारतीय स्टेट बँकेने प्रोबेशनरी ऑफिसरच्या 600 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2025 आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.