Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार

या निर्णयामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पातील अडथळे दूर होऊन प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 27, 2026 | 09:39 AM
IRCTC ticket refund policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम केले लागू

IRCTC ticket refund policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम केले लागू

Follow Us
Follow Us:
  •   नारायणगाव येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) परिसरातील ‘बफर झोन’मुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने केंद्र सरकारने मूळ सरळ रेल्वे मार्गाला नकार दिला आहे.
  •  कमीत कमी वळसा घेणारा आणि जास्तीत जास्त महत्त्वाची गावे जोडणारा नवीन मार्ग निश्चित करण्यासाठी राज्य सरकार तज्ञ सल्लागाराची नियुक्ती करणार आहे.
  •  आमदार सत्यजित तांबे यांनी प्रकल्पातील विलंब आणि तांत्रिक आक्षेपांबाबत स्पष्टीकरण मागत, या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि कृती समितीची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली आहे.

Pune Politics: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ सरळ मार्गाला केंद्र सरकारने तांत्रिक कारणास्तव नकार दिल्यानंतर राज्य सरकारने पर्यायी मार्ग निश्चित करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नारायणगाव येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) परिसरातील ‘बफर झोन’मुळे मूळ मार्ग आराखड्यास मान्यता देणे शक्य नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कमीत कमी वळसा घेणारा आणि महत्त्वाच्या गावांचा समावेश करणारा नवा मार्ग निश्चित करण्यासाठी तंत्रज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधान परिषदेत या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित करत पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या रखडलेल्या कामाबाबत आणि मार्गातील बदलाबाचत स्पष्टीकरण मागितले. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, जीएमआरटीने स्वतःहून कोणताही तांत्रिक आक्षेप नोंदवलेला नसल्याचे त्यांनी नमूद केले. तरीदेखील मार्गात बदल करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून रेल्वे मागांतील परिसरात आंदोलने होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोठी बातमी ! राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट केले जाणार; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

जास्त गावे समाविष्ट करणारा मार्ग

तसेच, या प्रश्नावर मुख्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कृती समिती यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणीही आमदार तांबे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, या प्रकल्पासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दोन वेळा सादरीकरण केले असून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नवीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यासाठी तज्ञ समितीमार्फत सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. रेडिओ दुर्बिणीच्या ‘बफर झोन’चा विचार करून कमीत कमी वळसा घेणारा आणि जास्तीत जास्त महत्त्वाची गावे समाविष्ट करणारा मार्ग निश्चित करण्यात येईल.

मोठी बातमी ! राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट केले जाणार; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

४ महिन्यांत अहवाल

या निर्णयामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पातील अडथळे दूर होऊन प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या रेल्वेमुळे दोन्ही शहरामधील प्रवास जलद, सुलभ आणि अधिक सोयीस्कर होणार असून औद्योगिक, व्यावसायिक आणि प्रादेशिक विकासालाही चालना मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले.

 

Web Title: Pune nashik railway route to change central government rejects original plan due to gmrt buffer zone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Indian Railways
  • Nashik
  • Pune

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक
2

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
3

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा
4

आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.