Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE Main 2026 ऑफलाइन होणार? एक चूक ठरू शकते महाग, विद्यार्थ्यांनी आताच करावी ‘अशी’ तयारी

JEE Main 2026 च्या जानेवारी सत्रासाठी 14.5 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा 21 ते 30 जानेवारीदरम्यान होणार आहे. दरम्यान, पेपर लीक रोखण्यासाठी JEE, NEET ऑफलाइन घेण्याचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 13, 2025 | 01:23 PM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • JEE Main 2026 जानेवारी सत्रासाठी 14.5 लाख नोंद
  • पेपर लीक रोखण्यासाठी ऑफलाइन परीक्षेचा प्रस्ताव
  • ऑफलाइन असल्यास OMR शीटवर उत्तरे भरावी लागणार
JEE Main 2026: जेईई मेन २०२६ ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात येणार आहे. त्यातील जानेवारी सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या परीक्षेसाठी जवळपास 14.5 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र या परीक्षेत काही बदल होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये घेण्यात येऊ शकते. अश्यात जर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेची तयारी केली असेल म्हणजेच त्यांनी ऑनलाईन टेस्ट सिरीज दिली असेल, त्या विद्यार्थ्यांपुढे ऑफलाईन परीक्षा देण्याचे आवाहन तर आहेच. मात्र त्यांची एक चूक त्यांना महाग पडू शकते. चला जाणून घेऊया विध्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येऊ शकता, त्यासाठी उपाय काय?

भारतीय विद्यार्थ्यांच्या अडवणुकीसाठी Gold Card Visa, ट्रम्पच्या मनमानीचा आणखी एक नमुना

जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (JEE) 2026 ही परीक्षा २१ जानेवारी २०२६ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. पेपर लीकसारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसात आहे. यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी JEE, NEET आणि CUET परीक्षा ऑफलाइन (पेन-पेपर मोडमध्ये) घेण्याचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आला आहे. या निर्णयावर अजूनही चर्चा सुरु आहे. जर हा निर्णय घेण्यात आला तर विध्यार्थ्यांना परीक्षेची वेगळी मोड असेल.

एक चूक आणि संपूर्ण वर्ष वाया जाण्याचा धोका

  • ऑफलाईन परीक्षेत विध्यार्थ्यांना OMR शीटवर उत्तरे भरावी लागतील. शीटवर गोळे भरतांना अतिशय काळजी घायवी लागेल. स्वच्छ आणि अचूक मार्किंगची सवय विध्यार्थ्यांना लावावी लागेल.
  • एखादा उत्तर चुकून वर-खाली चुकीच्या गोळ्यात भरले गेले, तर त्यानंतरची सर्व उत्तरे चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच OMR शीटवर मॉक टेस्ट सोडवण्याचा सराव करणे आवश्यक आहे.
टाइम मॅनेजमेंटवर विशेष लक्ष देणे महत्वाचे

ऑनलाइन परीक्षांमध्ये स्क्रीनवर टाइमर आणि ऑटो नेव्हिगेशन असते. मात्र, ऑफलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांना स्वतः वेळेचे नियोजन करावे लागेल. ज्यांनी जास्तीत जास्त ऑनलाइन मॉक टेस्ट दिल्या आहेत, त्यांच्यासाठी हे आव्हानात्मक ठरू शकते.

उपाय काय?

1) दोन्ही फॉरमॅटची तयारी ठेवा
परीक्षा ऑफलाइन होईल की ऑनलाइन, हे अजूनही ठरलेलं नाही आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने मॉक टेस्ट द्याव्यात.

2) टाइम मॅनेजमेंटचा सराव करा
ठराविक वेळेत पेपर सोडवण्याचा सराव केल्यास आत्मविश्वास वाढतो.

3) बेसिक्स मजबूत करा
परीक्षा कोणत्याही मोडमध्ये असली तरी कॉन्सेप्ट क्लिअर असणे सर्वात महत्त्वाचे आहे. सूत्रे, युनिट्स, डायग्राम आणि सोप्या प्रश्नांचा सोडवण्याचा पद्धत यांचा नियमित सराव करा.

4) परीक्षा मोडबद्दल ताण घेऊ नका
परीक्षेचा उद्देश तुमचे ज्ञान तपासणे आहे. त्यामुळे फॉरमॅटपेक्षा तयारीवर अधिक लक्ष द्या.

5) सोपी अभ्यास साधने वापरा
नोट्स, NCERT ची मूलभूत माहिती आणि टॉपिकनुसार प्रश्नसंच यांचा वापर करून अभ्यास करा. तुमच्या शिकण्याच्या कौशल्यांना चालना मिळेल अशा पद्धतीने तयारी करावी.

UGC, AICTE आणि NCTE नष्ट होण्याच्या मार्गावर! उच्च शिक्षणात मोठा बदल, कॅबिनेटमध्ये मिळाली मान्यता

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: JEE Main 2026 ऑफलाइन होणार आहे का?

    Ans: सध्या फक्त प्रस्ताव आहे, अधिकृत निर्णय झालेला नाही.

  • Que: ऑफलाइन परीक्षेत अडचणी काय असतील?

    Ans: OMR शीटवर चुकीची मार्किंग, टाइम मॅनेजमेंट आणि सेक्शन नियोजन आव्हान ठरू शकते.

  • Que: विद्यार्थ्यांनी आत्ताच काय तयारी करावी?

    Ans: ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही फॉरमॅटमध्ये मॉक टेस्ट सोडवण्याची प्रॅक्टिस करावी.

Web Title: Will jee main 2026 be conducted offline one mistake can prove costly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

राजकारणी होण्यासाठी शिक्षित असणे किती महत्त्वाचे? खरंच शिक्षण गरजेचं आहे का? जाणून घ्या
1

राजकारणी होण्यासाठी शिक्षित असणे किती महत्त्वाचे? खरंच शिक्षण गरजेचं आहे का? जाणून घ्या

BPT आणि BOT अभ्यासक्रमांसाठी आता NEET द्वारेच प्रवेश! NCAHP ने जाहीर केली नोटीस
2

BPT आणि BOT अभ्यासक्रमांसाठी आता NEET द्वारेच प्रवेश! NCAHP ने जाहीर केली नोटीस

Padma Awards 2026 List: साहित्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कारांची घोषणा!
3

Padma Awards 2026 List: साहित्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कारांची घोषणा!

UGC NET 2026 Results: उमेदवारांची प्रतीक्षा संपणार! UGC-NET डिसेंबर 2025 निकाल लवकरच जाहीर होणार
4

UGC NET 2026 Results: उमेदवारांची प्रतीक्षा संपणार! UGC-NET डिसेंबर 2025 निकाल लवकरच जाहीर होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.