गोल्ड कार्ड व्हिसा काय आहे (फोटो सौजन्य - iStock)
गोल्ड कार्ड व्हिसा काय आहे?
या नवीन गोल्ड कार्ड व्हिसा अंतर्गत शिक्षण आणि योग्यतेनुसार नोकरी मिळविण्याची तरतूद आहे. भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांजवळ जर व्हिसा मिळविण्यासाठी 9 कोटी रूपये असतील तर त्यांनी अमेरिकेला का म्हणून जावे? भारतीय विद्यार्थी अमेरिकेला जातात, ते त्यांचे आर्थिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी. यावरून हे स्पष्ट होते की, अमेरिकेला केवळ ‘टॅलेंट’च नाही तर टॅलेंटसोबत पैसाही पाहिजे आहे आणि म्हणून जे विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेऊन तेथेच नोकरी करण्याचे स्वप्न पाहतात, त्यांच्यासाठी आता अमेरिकेत राहणे अत्यंत कठीण होईल.
अमेरिकेतील भारतीय कंपन्या आपल्या कर्मचा-यासाठी 9 कोटी रूपये खर्च करण्यास तयार होणार नाही. याशिवाय प्रत्येक कर्मचा-यावर 15 ते 20 हजार डॉलर प्रोसेसिंग फी आणि 18 ते 20 लाख डॉलर म्हणजे 18 ते 20 व्हिसा मागणा-या हजारो तरूणांच्या मुलाखती टाळण्यात आल्या आहेत. नवीन गोल्ड कार्ड व्हिसा कार्यक्रम प्रामुख्याने गुंतवणूकदार आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना अमेरिकेचे दरवाजे उघडतात. अशा परिस्थितीत दरवर्षी जे लाखो भारतीय विद्यार्थी अमेरिकेला जाण्यासाठी उत्सुक असतात, त्यांचे काय होईल? हा नवीन गोल्ड कार्ड व्हिसा अमेरिकेने सुरू केला असून ज्याचा प्राथमिक उद्देश अमेरिकेसाठी निधी मिळविणे आहे.
किती आहे खर्च
कोटी रूपये खर्च करावे लागतील, याशिवाय 1 टक्का रक्कम वार्षिक देखभाल आणि 5 टक्के ट्रान्सफर फी सुद्धा भरावी लागेल, कोणतीही कंपनी एव्हढी मोठी रक्कम खर्च करणार नाही. भारतातील आयटी कंपन्यांवर याचा मोठा परिणाम होईल. ही अमेरिकेत नोकरीसाठी ऑफर नसून अमेरिकेत राहण्यासाठी मुख्य अट आहे आणि म्हणून कोणताही सामान्य सॉफ्टवेयर इंजिनिअर, डॉक्टर, संशोधक इतके पैसे खर्च करून अमेरिकेत राहण्याचे स्वप्न पाहू शकेल काय?
भारतात कित्येक लोक असे आहेत की, जे व्हिसाचा लाभ घेतात. यामध्ये प्रामुख्याने भारतीय वंशाचे उद्योगपती आहेत, जे अमेरिकेत आपल्या व्यवसायाचा विस्तार करू इच्छितात. त्यांच्यासाठी हे सर्व करणे शक्य आहे. याचप्रमाणे भारतीय स्टार्टअप फाऊंडर, ज्यांच्याकडे डॉलरच्या स्वरूपात प्रचंड रक्कम आहे, तेच अमेरिकेला जाऊ शकतात. श्रीमंत व्यक्तींना अमेरिकेला जाण्यासाठी आकर्षित करणे असा आहे. जे विद्यार्थी शिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळण्याची अपेक्षा ठेऊन असतात, त्यांच्या या अपेक्षा गोल्ड कार्ड व्हिसा पूर्ण करू शकत नाही.






