Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ तारखेपासून World Sustainable Development Summit होणार सुरु

वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट येत्या 5 मार्चला सुरु होणार आहे. या कार्यक्रमात अनेक जण सहभागी होणार आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 17, 2025 | 07:19 PM
'या' तारखेपासून World Sustainable Development Summit होणार सुरु

'या' तारखेपासून World Sustainable Development Summit होणार सुरु

Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट (डब्ल्यूएसडीएस)ची २४ वी आवृत्ती ५ ते ७ मार्च २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल. दि एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी)कडून दरवर्षी आयोजित केला जाणारा डब्ल्यूएसडीएस हा शाश्वत विकास व हवामान उपाययोजनांचा प्रचार करण्यासाठी जागतिक उपक्रम आहे. या परिषदेचे प्रास्ताविक भारत सरकारचे माननीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव करतील.

ग्लोबल साऊथमध्ये स्थित शाश्वत विकास तसेच पर्यावरणावर आधारित स्वतंत्ररित्या आयोजित केली जाणारी एकमेव परिषद म्हणून डब्ल्यूएसडीएस २०२५ ‘शाश्वत विकासाला वेग तसेच हवामान उपाययोजनांसाठी भागीदारी’ या संकल्पनेभोवती आयोजित केली जाणार आहे. त्यातून जागतिक हवामान आव्हानांचा सामने करून शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या गरजेवर भर दिला जाईल. एसडीजीच्या पूर्ततेबाबत जग पिछाडीवर आहे आणि उत्सर्जन तात्काळ कमी करण्याची गरज असल्याने ही परिषद कृतीसाठी भागीदारीच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करेल.

परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी मिळण्याची संधी, 240000 रुपये भरघोस पगार

टेरीच्या महासंचालक डॉ. विभा धवन म्हणाल्या की, “बदलात्मक हवामान कृतीचा भागीदारी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. डब्ल्यूएसडीएस २०२५ मध्ये आम्ही सीमांपल्याड जाणारे एकत्रित प्रयत्न करून शाश्वत भविष्यासाठी नावीन्यपूर्णतेला व महत्त्वाकांक्षी उपाययोजनांना प्रेरणा देणे यासाठी कार्यरत आहोत. डब्ल्यूएसडीएस २०२५ हे ही भागीदारी जोडून एका प्रभावी बदलाला प्रेरित करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.”

शाश्वत विकास उद्दिष्टे आणि पॅरिस हवामान करारनामा स्वीकारल्यानंतर एक दशकाच्या कालावधीने यंदा या परिषदेचे आयोजन केले जात आहे. प्रारंभीच्या तसेच चर्चासत्रांनंतर या परिषदेत सात सत्रे आयोजित होतील. त्यात शाश्वत वित्तपुरवठा, ऊर्जा संवर्धन, निसर्ग, हवामानाप्रति वचनबद्धता, तग धरण्याची क्षमता, नावीन्यपूर्णता आणि शाश्वत विकासाला केंद्रीभूत करणे या मुद्द्यांचा समावेश असेल. या परिषदेत २४ संकल्पनात्मक घटकही असतील.

शाहरूख खान, अमिताभ बच्चन, अरूण जेटली यासारख्या धुरंधरांनी घेतले ‘या’ महाविद्यालयातून शिक्षण, कशी मिळेल Admission

डब्ल्यूएसडीएस २०२५ मध्ये जागतिक विचारवंत, धोरणकर्ते, वैज्ञानिक, उद्योगातील तज्ञ तसेच तरूण नेते सहभागी होऊन एसडीजीचा विकास करण्यासाठीच्या संदेशांवर चर्चा करतील. त्यात भागीदारी, चर्चा यांची सीओपी३० च्या दिशेने भारतात आयोजित होणाऱ्या सीओपी३३ पर्यंत जाताना एसडीजीला वेग देण्यासाठी भूमिका अशा मुद्द्यांचा समावेश असेल. तसेच नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रिब्युशन्सवर (एनडीसी) महत्त्वाकांक्षांना वेग देणे आणि ग्लोबल साऊथसाठी भारताची आघाडी व विद्यमान हवामान कृती परिस्थितीत जागतिक संवाद स्थापित करणे अशा गोष्टींचा समावेश असेल.

“या परिषदेतून तीन मुद्द्यांवर महत्त्वाकांक्षा आणि कृती केली जाईल: शाश्वत विकासाचा वेग वाढवणे, सीओपी३० साठी महत्त्वाचे संदेश तयार करणे आणि एनडीसी ३.० मध्ये अधिक महत्त्वाकांक्षा तयार करून हवामानाला न्याय देणे,” असे मत डब्ल्यूएसडीएसच्या निर्मात्या आणि टेरीमधील सीनियर फेलो डॉ. शैली केडीया यांनी व्यक्त केले.

Web Title: World sustainable development summit will be started on 5th march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 07:19 PM

Topics:  

  • Career News
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार ‘हे’ बदल, समजून घ्या
1

ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार ‘हे’ बदल, समजून घ्या

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण
2

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?
3

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?

बलुचिस्तान हादरला! क्वेटा शहरात मोठा आत्मघातकी हल्ला; १० ठार, अनेक जखमी
4

बलुचिस्तान हादरला! क्वेटा शहरात मोठा आत्मघातकी हल्ला; १० ठार, अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.