Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! 13 वर्षांच्या मुलाचा 8 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार; मुलीचे आई-वडिल कामाला गेल्यानंतर ‘तो’ आला अन्…

मुलीची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारासाठी विलंब होत असल्याने नातेवाईकांनी संतप्त होत निदर्शन केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 20, 2025 | 10:59 AM
साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर युवकाकडून अत्याचार

साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर युवकाकडून अत्याचार

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात 65 वर्षीय नराधमाने एका तीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. अशातच दर्यापूर तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना एका गावात 18 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. यामध्ये 13 वर्षीय मुलाने 8 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे.

हेदेखील वाचा : Badlapur crime : ‘शेजारचा दादा आला आणि कडेवर घेऊन अंधाऱ्या ठिकाणी…,’ ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; बदलापूर पुन्हा हादरलं

पीडित मुलीला शनिवारी (दि.18) रात्री अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठ वर्षीय मुलीचे आई-वडिल हे कामावर गेले होते. अशातच विधीसंघर्ष बालकाने आपल्या लहान भावाच्या माध्यमातून आठ वर्षीय मुलीला घरी बोलाविले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीची आई घरी आल्यानंतर तिला हा धक्कादायक प्रकार माहिती पडला. त्यामुळे त्यांनी तत्काळ दर्यापूर पोलिसात तक्रार केली. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीचे शोधकार्य सुरु केले होते.

दरम्यान, मुलीची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारासाठी विलंब होत असल्याने नातेवाईकांनी संतप्त होत निदर्शन केले. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्राम्हणे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रकरण शांत झाले.

विवाहित महिलेवर अत्याचार

एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्यामुळे ती गर्भवती राहिली आणि तिची प्रसूती झाली. या घटनेची तक्रार पीडित महिलेने शनिवारी (दि. 18) चांदूरबाजार पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी रोशन राजाराम बेठे (22, रा. जैतदिनी, ता. चिखलदरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार तीचे लग्न झाले असून, तिचे पती मुंबई येथील कंपनीत काम करतात. महिलेचे माहेर हे पिली गावातील असून, तिची 2022 मध्ये रोशनसोबत ओळख झाली.

बदलापुरात पुन्हा लैंगिक अत्याचार

बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याचं पुढं आलं आहे. आरोपीने या मुलीला अंधाऱ्या निर्जनस्थळी नेलं व तिच्यावर अत्याचार केले. आरोपी हा देखील अल्पवयीन असल्याची माहिती आहे. याप्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : Kolkata Doctor Case: ‘त्या’ अत्याचार प्रकरणात कोर्ट आज निकाल देणार; CBI ने केली मृत्यूदंडाची मागणी

Web Title: 13 year old boy assaults 8 year old girl incident in amravati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • Abused of Minor Girl
  • Amravati Crime News
  • Amravati News

संबंधित बातम्या

Amravati News : मोदींचा काटकसरीचा मंत्र अन् सोशल मीडियावर वादाची ठिणगी
1

Amravati News : मोदींचा काटकसरीचा मंत्र अन् सोशल मीडियावर वादाची ठिणगी

Amravati News: कृषी नियंत्रण कक्षाचा ‘वॉच’! खरीप हंगाम; बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार रोखणार
2

Amravati News: कृषी नियंत्रण कक्षाचा ‘वॉच’! खरीप हंगाम; बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार रोखणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.